आगामी Lava Yuva 3 लाँच होण्यापूर्वी Amazon वर सूचीबद्ध, मोठी स्टोरेज आणि Best फीचर्ससह होणार दाखल। Tech News 

आगामी Lava Yuva 3 लाँच होण्यापूर्वी Amazon वर सूचीबद्ध, मोठी स्टोरेज आणि Best फीचर्ससह होणार दाखल। Tech News 
HIGHLIGHTS

Lava Yuva 3 भारतीय बाजारात लवकरच लाँच होणार

आगामी मोबाईल फोन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर लिस्ट झाला.

या स्मार्टफोनमध्ये 128GB अंतर्गत स्टोरेज मिळेल, जे 512GB पर्यंत वाढवता येईल.

Lava चा आगामी स्मार्टफोन Lava Yuva 3 भारतीय बाजारात लवकरच लाँच होणार आहे. या स्मार्टफोनची टीजिंग सुरू झाली आहे. आता आगामी मोबाईल फोन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर लिस्ट झाला आहे, याद्वारे फोनचे काही स्पेक्स उघड झाले आहेत. मात्र, Amazon सूचीमधून स्मार्टफोनच्या इतर फीचर्सशी संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही. यापूर्वी Lava Yuva 3 Pro स्मार्टफोन भारतात बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा: RBI चा मोठा निर्णय! Paytm युजर्सना आता FasTAG ते वॉलेटपर्यंत ‘या’ सेवा मिळणार नाही, वाचा सविस्तर। Tech News

lava yuva 3 pro

Lava Yuva 3 चे उघड झालेले स्पेक्स

Amazon वरील ऍक्टिव्ह लाइव्ह पेजनुसार, Lava Yuva 3 लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. आगामी स्मार्टफोनची विक्री Amazon वरून सुरु होईल. वर सांगितल्याप्रमाणे, या स्मार्टफोनचे काही स्पेक्स देखील उघड झालेले आहेत. लाईव्ह पेजनुसार फोनचे स्टोरेज उघड झाले आहे. या स्मार्टफोनमध्ये 128GB अंतर्गत स्टोरेज मिळेल, जे 512GB पर्यंत वाढवता येईल. हा फोन सुरुवातीच्या 64GB स्टोरेज वेरिएंटमध्ये देखील उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, स्मार्टफोनच्या स्पेक्ससंबंधित कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Lava Yuva 3 अपेक्षित लाँच टाइमलाईन आणि किंमत

स्मार्टफोन कंपनी Lava ने अद्याप Yuva 3 च्या लॉन्च किंवा किंमतीबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. मात्र, हे डिव्हाइस या महिन्याच्या सुरुवातीला लाँच केले जाईल, असे म्हटले जात आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. फोन लाँच झाल्यानंतरच त्याची खरी किंमत उघडकीस येईल.

Lava Yuva 3 चे अपेक्षित स्पेक्स

अलीकडेच पुढे आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसा, आगामी Lava Yuva 3 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह HD Plus डिस्प्ले मिळू शकतो. यात मिड-रेंज प्रोसेसर आणि 4GB रॅम दिली जाऊ शकते. हा फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. तसेच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी असण्याची देखील शक्यता आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंगला टेक्नॉलॉजीच्या समर्थनासह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo