अगदी Affordable किमतीत LAVA Yuva 3 भारतात लाँच, कमी किमतीत जबरदस्त फीचर्ससह उपलब्ध। Tech News

Updated on 02-Feb-2024
HIGHLIGHTS

LAVA Yuva 3 स्मार्टफोन अधिकृतपणे भारतात लाँच

स्मार्टफोन 6,799 रुपये या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.

हा फोन Unisoc T606 ऑक्टाकोर प्रोसेसरसह सज्ज आहे.

काही काळापासून भारतीय स्मार्टफोन ब्रँड Lava च्या ‘Yuva’ सिरीजअंतर्गत येणाऱ्या नवीन स्मार्टफोन LAVA Yuva 3 च्या लाँचची तयारी सुरु होती. तर, काल हा मोबाईल शॉपिंग साइट Amazon India वर लिस्ट करण्यात आला होता. त्यानंतर आज कंपनीने नवीन Lava स्मार्टफोनचे अनावरण केले आहे. होय, LAVA Yuva 3 स्मार्टफोन अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात आले आहे. जाणून घेऊयात नवीन Lava Yuva 3 ची किंमत आणि फीचर्स-

हे सुद्धा वाचा: आगामी Nothing Phone (2a) चे भारतीय लाँच अखेर कन्फर्म! फोन Flipkart वर सूचीबद्ध, बघा सर्व डिटेल्स। Tech News

LAVA Yuva 3 ची किंमत

Lava ने आपला नवीन स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,799 रुपये आहे. तर, LAVA Yuva 3 च्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,299 रुपये आहे. हा फोन Eclipse Black, Cosmic Lavender आणि Galaxy White या कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. Amazon या शॉपिंग साइटवर Lava Yuva 3 ची विक्री 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

LAVA Yuva 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

LAVA Yuva 3 मध्ये 6.5 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह काम करतो. ही स्क्रीन पंच होल स्टाइलवर बनवली गेली आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन Unisoc T606 ऑक्टाकोर प्रोसेसरसह सज्ज आहे. त्याबरोबरच, स्मार्टफोन Android 13 OS वर लाँच करण्यात आला आहे, जो 2 वर्षांच्या OS आणि सुरक्षा अपडेट्ससह येतो. या फोनमध्ये 4GB व्हर्च्युअल रॅमचे सपोर्ट देखील आहे.

फोटोग्राफीसाठी LAVA Yuva 3 ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह 13MP चा मेन सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा फोन 5,000 mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी 18W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाचे समर्थन देखील देण्यात आले आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :