Lava Yuva 3 First Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरू, ऑफर्ससह Affordable किमतीत खरेदी करण्याची संधी

Lava Yuva 3 First Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरू, ऑफर्ससह Affordable किमतीत खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

Lava Yuva 3 हा कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन आहे.

नव्या स्मार्टफोनची व्रिकी Amazon India वरून आजपासून सुरु

सेल दरम्यान डिव्हाइसवर उत्कृष्ट ऑफर आणि डील्स मिळत आहेत.

देशी कंपनी Lava ने नुकतेच Lava Yuva 3 हा कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केला. त्यानंतर, आज म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी या स्मार्टफोनची पहिली विक्री ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सुरु झाली आहे. सेल दरम्यान डिव्हाइसवर उत्कृष्ट ऑफर आणि डील्स मिळत आहेत. विशेष म्हणजे हा मोबाइल फोन AI कॅमेरासह सज्ज आहे. यात HD डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देखील देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Lava Yuva 3 वरील ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Moto G24 Power ची आज पहिली सेल सुरु, Flipkart वर लेटेस्ट स्मार्टफोन्स Best ऑफर्ससह उपलब्ध। Tech News

Lava Yuva 3 in India
Lava Yuva 3 in India

Lava Yuva 3 ची किंमत आणि ऑफर

Amazon India वर Lava Yuva 3 चा पहि;ली सेल दुपारी 12 वाजतापासून सुरु झाली आहे. या स्मार्टफोनच्या 4GB + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,799 रुपये आहे. तर, त्याचा 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 7,299 रुपयांना उपलब्ध असेल. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक सवलतीसोबतच परवडणारी EMI आणि एक्सचेंज ऑफरही देण्यात येणार आहेत. हा स्मार्टफोन Cosmic Lavender, Eclipse Black आणि Galaxy White शेड कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. Buy From Here

Lava Yuva 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंच लांबीचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 ऑक्टा-कोर चिपसेट आहे. जी 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज पेयर केली गेली आहे. या फोनची रॅम वाढवता येईल. या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.

lava yuva 3

नवीन स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 13MP प्राथमिक सेन्सर आणि AI लेन्सचा सपोर्ट आहे. तसेच, आकर्षकी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 5MP कॅमेरा देखील आहे. नवीन स्मार्टफोन 18W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G, ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ 5.0 आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo