digit zero1 awards

Lavaचा नवीन फोन 7,999 रुपयांच्या किमतीत लाँच, पहा फीचर्स आणि जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

Lavaचा नवीन फोन 7,999 रुपयांच्या किमतीत लाँच, पहा फीचर्स आणि जबरदस्त स्पेसिफिकेशन्स
HIGHLIGHTS

Lava Yuva 2 Pro बजेट स्मार्टफोन लाँच

फोनची किंमत 7,999 रुपये आहे.

फोनमध्ये 4GB RAM आणि अतिरिक्त 3GB व्हर्च्युअल रॅम मिळते.

स्मार्टफोन ब्रँड Lava ने मंगळवारी भारतात आपला नवीन फोन Lava Yuva 2 Pro लाँच केला आहे. हा फोन Lava Yuva Pro चा सक्सेसर म्हणून आणला गेला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 4GB RAM आणि अतिरिक्त 3GB व्हर्च्युअल रॅम मिळते. त्याबरोबरच, MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि 6.5-इंच लांबीचा HD Plus डिस्प्ले Lava Yuva 2 Pro सह उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनची किंमत आणि फीचर्स…

हे सुद्धा वाचा : भन्नाट ऑफर ! Motorola G62 5G च्या किमतीत मोठी कपात, FLIPKARTवर मिळतेय भारी सूट

Lava Yuva 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Lava Yuva 2 Pro ला 6.5-इंच लांबीचा HD Plus डिस्प्ले मिळतो, जो 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 269 PPI सह येतो. फोनमध्ये MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि 4 GB रॅमची पॉवर समर्थित आहे. RAM 3 GB पर्यंत वाढवता येते आणि फोनमध्ये 64 GB स्टोरेज आहे, जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने 256 GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.

Lava Yuva 2 Pro मध्ये Wi-Fi, ब्लूटूथ व्हर्जन 5.1 आणि 4G कनेक्टिव्हिटीसाठी सपोर्ट करण्यात आला आहे. फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB Type-C चार्जिंग आहे. तसेच, यात 5,000mAh Li-Polymer बॅटरी आणि 10W फास्ट चार्जिंग आहे. बॉक्समध्ये ऍडॉप्टर फोनसोबत येतो.

याशिवाय, हा लावा फोन तीन रियर कॅमेऱ्यांसह सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 13-मेगापिक्सेल एआय सेन्सर आणि दोन इतर VGA कॅमेरे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

Lava Yuva 2 Pro ची किमंत 

लावाचा नवा फोन ग्लास व्हाइट, ग्लास ग्रीन आणि ग्लास लॅव्हेंडर या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. Lava Yuva 2 Pro सिंगल 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची किंमत 7,999 रुपये आहे.

याव्यतिरिक्त, Lava ने अलीकडेच edtech प्लॅटफॉर्म Doubtnut सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डाऊटनट कोर्स मटेरियलचे मोफत सबस्क्रिप्शनही फोनवर मिळेल. या सबस्क्रिप्शनची एक वर्षाची सदस्यता 12,000 रुपयांपर्यंत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo