लावाने आज आपला नवीन स्मार्टफोन लावा X46 4G सपोर्टसह ७,९९९ रुपयात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सोनेरी रंगातही उपलब्ध आहे. कंपनीने ह्याला आपल्या ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून लाँच केले आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD 720p IPS डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्यात 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर दिले गेले आहे. ह्यात 2GB ची रॅमसुद्धा देण्यात आली आहे. ह्यात आपल्याला 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले असेल, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्यात 2500mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा दिली आहे. कंपनीनुसार, हा ११ तास ३३ मिनिटांचा टॉकटाइम आणि ६ दिवस ८ तास आणि २९ मिनिटांचा स्टँडबाय टाइम देण्यास सक्षम आहे.
https://twitter.com/LavaMobile/status/740166549596700672
ह्यात फोटोग्राफीसाठी 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. ह्यात आपल्याला कनेक्टिव्हिटी पर्याय सुद्धा मिळत आहे.
हेदेखील वाचा – मार्क झुकरबर्गचा पिनटेरेस्ट आणि ट्विटर अकाउंट हॅक
हेदेखील वाचा – महिंद्रा eVerito इलेक्ट्रिक कार भारतात लाँच, किंमत ९.५० लाखांपासून सुरु