लावा V5 स्मार्टफोन लाँच
हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 3GB DDR3 रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी लावाने भारतात आपला नवीन स्मार्टफोन V5 सादर केला आहे. कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत 13,000 रुपये ठेवण्यात आली आहे.
लावा V5 स्मार्टफोन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी उपलब्ध होईल. ऑनलाइन विक्रीसाठी हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट ebay वर उपलब्ध होईल.
लावा V5 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची HD डिस्प्ले देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 3GB DDR3 रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
कनेक्टिव्हीटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G सपोर्टसह वायफाय, ब्लूटुथ, GPS आणि 3G सपोर्टसुद्धा मिळेल. लावा V5 स्मार्टफोन 1 वर्षाची मॅन्युफॅक्चरर वॉरंटीसह सादर केला गेला आहे. त्याचबरोबर ह्याची एक्सेसरिजवर ६ महिन्याची वॉरंटीसुद्धा मिळेल.
हा स्लाइडशो पाहा- हे ७ हायपरलोकल अॅप्स तुम्ही इन्स्टॉल केलेच पाहिजे
हेदेखील पाहा – लेनोवो K5 नोट स्मार्टफोन लाँच