लावा V2S स्मार्टफोन लाँच, किंमत ७,८९९ रुपये

लावा V2S स्मार्टफोन लाँच, किंमत ७,८९९ रुपये
HIGHLIGHTS

हा फोन 1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

मोबाईल निर्माता कंपनी लावाने आपला नवीन स्मार्टफोन V2S एका ऑनलाइन रिटेलर साइटवर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. ह्या साइटवर ह्याली ७,८९९ रुपयाच्या किंमतीत लिस्ट केले गेले आहे. हा हँडसेट ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर आयसी व्हाइट रंगात उपलब्ध आहे. तथापि आतापर्यंत लावाने आपल्या ह्या नवीन फोनला अधिकृतरित्या लाँच केले  नव्हते.

 

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचेरिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. हा फोन 1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

त्याशिवाय लावा V2S स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिगं कॅमेरा दिला गेला आहे. तसेच ह्यात ड्यूल-LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्यात 4G कनेक्टिव्हिटी आणि भारतीय LTE बँड सपोर्टसुद्घा दिला गेला आहे.

लावा V2S स्मार्टफोनमध्ये 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. लावा V2S चे परिमाण 141.6×70.8x8mm आहे. आणि वजन 129 ग्रॅम आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. तसेच हा अॅनड्रॉईड V6.0 मार्शमॅलोवर अपग्रेड केला जाऊ शकतो, असा दावा केला गेला आहे.

हेदेखील वाचा – अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

हेदेखील वाचा – AP FiberNet: अत्यंत कमी किंमतीचा इंटरनेट पॅक लाँच

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo