Lava Storm 5G स्मार्टफोनची Sale आजपासून भारतात सुरु, ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन। Tech News

Updated on 28-Dec-2023
HIGHLIGHTS

Lava च्या लेटेस्ट Lava Storm 5G स्मार्टफोनची विक्री सुरु

Lava Storm 5G च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

बँक ऑफरसह ग्राहक हा फोन 1500 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकतात.

प्रसिद्ध देशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava ने अलीकडेच आपल्या भारतीय वापरकर्त्यांसाठी नवीन 5G स्मार्टफोन Lava Storm 5G लाँच केला आहे. या स्मार्टफोनची विक्री आजपासून भारतात सुरु झाली आहे. पहिल्या सेल दरम्यान, कंपनी आपल्या ग्राहकांना केवळ 11,999 रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर हा फोन खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला या फोनची किंमत आणि फोनवरील उपलब्ध सर्व ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Jio ने वाढवले ​​Airtel-VI चे टेन्शन! फक्त 148 रुपयांमध्ये संपूर्ण महिन्यासाठी तब्बल 12 OTT सबस्क्रिप्शन उपलब्ध। Tech News

Lava Storm 5G ची किंमत आणि ऑफर्स

Lava Storm 5G च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Lava Storm 5G ची सेल आज म्हणजेच 28 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजतापासून सुरु झाली आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट Amazon आणि Lava ई-स्टोअरच्या माध्यमातून विकला जाईल. तर, हा फोन Amazon वर 13,499 रुपयांच्या सवलतीच्या किमतीत सूचीबद्ध आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफरसह ग्राहक हा फोन 1500 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. त्यानंतर हा फोन तुम्हाला फक्त 11,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. ब्रँडने हा फोन ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला आहे. येथून खरेदी करा

Lava Storm 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या लावा स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.78-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. कंपनीने त्यात MediaTek Dimensity 6080 चिपसेट समाविष्ट केला आहे. यासह फोनमध्ये तुम्हाला 128GB इंटर्नल स्टोरेज मिळेल, जी मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवू शकतात.

Lava Storm 5G

फोटोग्राफीसाठी, तुम्हाला 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळत आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी याच्या फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे.

फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये तुम्हाला GPRS, ब्लूटूथ, 5G, Wi-Fi आणि USB टाइप-C पोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन Android 13 वर चालेल. कंपनीने या हँडसेटबद्दल दावा केला आहे की, युजरला यामध्ये Android 14 चे अपडेट देखील मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :