digit zero1 awards

Lava Storm 5G Launched: 50MP कॅमेरा आणि Best फीचर्ससह जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी। Tech News 

Lava Storm 5G Launched: 50MP कॅमेरा आणि Best फीचर्ससह जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी। Tech News 
HIGHLIGHTS

देशी कंपनीने Lava Storm 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला.

या स्मार्टफोनची विक्री Amazon India वर 28 डिसेंबरपासून सुरू होईल.

फोटोग्राफीसाठी Lava Storm 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

नुकतेच Lava Storm 5G च्या लाँचची घोषणा करण्यात आली होती. आता अखेर देशी कंपनीने Lava Storm 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. लक्षात घ्या की, हा स्मार्टफोन प्रिमिअम लुकसह सादर करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेतील Oppo, Realme, Vivo, Samsung आणि Realme मधील प्रसिद्ध उपकरणांशी जोरदार स्पर्धा करेल. जाणून घेऊयात Lava Storm 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

हे सुद्धा वाचा: अरे बापरे! 1 जानेवारीपासून UPI ID होणार Deactivate? आजच आटपून घ्या ‘ही’ महत्त्वाची कामे। Tech News

LAVA STORM 5G PROCESSOR

Lava Storm 5G ची किंमत

देशी कंपनीच्या लेटेस्ट Lava Storm 5G स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. या स्मार्टफोनची विक्री Amazon India वर 28 डिसेंबरपासून सुरू होईल. एवढेच नाही तर, तुम्हाला शॉपिंगवर डिस्काउंट ऑफर्स देखील मिळतील.

Lava Storm 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर हा फोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरद्वारे सज्ज करण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये तुम्हाला 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

LAVA STORM 5G STORAGE

कॅमेरा विभागामध्ये फोटोग्राफीसाठी Lava Storm 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा देखील आहे. जे युजर्स सेल्फीचे शौकीन आहेत, त्यांच्यासाठी हा फ्रंट कॅमेरा उत्तम ठरेल.

पॉवर बॅकअपसाठी Lava ने Storm 5G मोबाईल फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या समर्थनासह येईल. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट देखील आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo