LAVA ने शेअर केला तुफानी 5G फोनचा टीझर, Lava Storm 5G नावाने प्रेक्षकांच्या मनावर करणार राज्य। Tech News 

LAVA ने शेअर केला तुफानी 5G फोनचा टीझर, Lava Storm 5G नावाने प्रेक्षकांच्या मनावर करणार राज्य। Tech News 
HIGHLIGHTS

Lava ने नवीन 5G स्मार्टफोनचा टीझर शेअर केला आहे.

आगामी नवीन फोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच होण्याची शक्यता

लावाच्या या नवीन फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे.

Lava ने अलीकडेच आपला स्वस्त फोन Lava Yuva 3 Pro नुकताच सादर केला आहे. त्यानंतर, आता ब्रँडने नवीन 5G स्मार्टफोनचा टीझर शेअर केला आहे. कंपनीने X म्हणजेच ट्विटरच्या अधिकृत अकाउंटवरून माहिती दिली आहे की, कंपनीचा आगामी स्मार्टफोन Lava Storm 5G नावाने लवकरच बाजारात दाखल होईल. त्यासोबतच, Amazon वर Storm 5G नावाची मायक्रो साइट देखील सूचिबद्ध झाली आहे. या नव्या फोनबद्दल अनेक लीक्स पुढे आले आहेत.

Lava Storm 5G बाबत लीक्स

प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने आगामी Lava Storm 5G बद्दल काही अपेक्षित डिटेल्स X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. तुम्ही पोस्टमध्ये पाहू शकता की, टिपस्टरने स्मार्टफोनचे वर्णन Lava Storm 5G असे केले आहे. त्याबरोबरच, आगामी नवीन फोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, हा फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेटसह येऊ शकतो. बॅटरी सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि जलद चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असू शकतो.

त्याबरोबरच, Lava Storm 5G मोबाईलमध्ये 6.5 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्टोरेजच्या बाबतीत, हा मोबाइल 8GB रॅम + 256GB इंटर्नल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी लावाच्या या नवीन फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 50MP प्राइमरी आणि 2MP इतर लेन्स असू शकतात. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनची कन्फर्म लाँच डेटची घोषणा लवकरच होईल.

lava yuva 3 pro

Lava Yuva 3 Pro ची किंमत

नुकतेच लाँच झालेल्या Lava Yuva 3 Pro च्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे. त्याबरोबरच, या लेटेस्ट लावा फोनची विक्री ई-स्टोअरवर सुरू झाली आहे. तर, हा स्मार्टफोन डेझर्ट गोल्ड, फॉरेस्ट विरिडियन आणि मेडो पर्पल कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo