देशी कंपनीचा नवा स्मार्टफोन Lava O2 भारतात लाँच, Affordable किमतीत मिळतायेत जबरदस्त फीचर्स| Tech News 

देशी कंपनीचा नवा स्मार्टफोन Lava O2 भारतात लाँच, Affordable किमतीत मिळतायेत जबरदस्त फीचर्स| Tech News 
HIGHLIGHTS

लेटेस्ट LAVA O2 स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे.

या फोनची किंमत 7,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी यात 50MP ड्युअल AI रियर कॅमेरा आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशी कंपनीच्या लेटेस्ट LAVA O2 स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हे बजेट रेंजमध्ये सादर केला गेला आहे. हा स्वस्त स्मार्टफोन पंच होल डिस्प्ले आणि प्रीमियम ग्लास फिनिश डिझाइनसह आणले गेले आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोन व्हर्च्युअल रॅमलाही सपोर्ट करतो. लावाचा हा फोन एजी ग्लास ब्लॅक डिझाइनसह येतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स.

हे सुद्धा वाचा: Jio New Plan: कंपनीने लाँच केला 49 रुपयांचा स्वस्त आणि मस्त प्लॅन, मिळेल भरपूर डेटा। Tech News

Lava O2 display, battery & more details revealed ahead of March 22 launch

Lava O2 ची भारतीय किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, देशी कंपनीने हा स्मार्टफोन बजेट विभागात सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत 7,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 27 मार्च 2024 पासून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

हा फोन Amazon आणि Lava च्या अधिकृत साईटवरून खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन मॅजेस्टिक पर्पल, इम्पीरियल ग्रीन आणि रॉयल गोल्ड या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.

Lava O2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Lava O2 स्मार्टफोन 6.5-इंच लांबीच्या HD+ पंच होल डिस्प्लेसह सुसज्ज आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Unisoc T616 Octa-Coreप्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह तुम्हाला उत्तम परफॉर्मन्स मिळणार आहे. तुम्हाला फोनमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळणार आहे. फोनची स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल. सुरक्षिततेसाठी फोनमध्ये फेक अनलॉकसह फिंगरप्रिंट सेन्सरदेखील मिळणार आहे.

कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी यात 50MP ड्युअल AI रियर कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवररसाठी फोनमध्ये फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे. फोन Android 13 वर चालतो. फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ आणि हेडफोन जॅक आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo