लावा X10 स्मार्टफोन लाँच
ह्यात 1GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि ३जीबीची रॅम दिली गेली आहे. हा स्मार्टफोन १६जीबीच्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.
मोबाईल निर्माता कंपनी लावाने आपला नवीन स्मार्टफोन X10 बाजारात लाँच केला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत ११,५०० रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोर्सवर उपलब्ध होईल. कंपनीने ह्या स्मार्टफोनला अलीकडेच आपल्या अधिकृत साइटवर लिस्ट केले गेले होते.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 ने कोटेड आहे. त्याचबरोबर ह्यात 1GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 3GB ची रॅम दिली गेली आहे. हा स्मार्टफोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.
ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. फ्रंट कॅमे-यामध्ये ८४ डिग्री वाइड अँगल्स दिले गेले आहे, ज्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या प्रकाशात इमेज क्लिक केली जाऊ शकते. ह्यात 2900mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ, GPS, OTG आणि 3G फीचर्स दिले गेले आहे. हा फोन आइस व्हाइट आणि रॉयल ब्लॅक रंगात उपलब्ध असेल.
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile