३जीबी रॅमने सुसज्ज असलेला लावा आयरिश X10 स्मार्टफोन लाँच

Updated on 27-Nov-2015
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.

मोबाईल निर्माता कंपनी लावाने भारतात आपला नवीन स्मार्टफोन आयरिश X10 लाँच केला आहे. कंपनीने ह्याची किंमत १०,९९९ रुपये ठेवली आहे. सध्यातरी ह्याला ऑनलाईन शॉपिंग साइटवर लिस्ट केले गेले आहे. सध्यातरी हा खरेदीसाठी उपलब्ध नाही. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट होमशॉप 18 वरुन खरेदी करु शकता.

 

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. फोनची स्क्रीन IPS तंत्रज्ञानाने बनवली आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.

 

ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्यात 2900mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीने ह्याची बॅटरी 15 तास टॉकटाईम आणि 849.2 तासाचा स्टँडबाय टाईम देण्याचा दावा करते.

 

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3G, वायफाय आणि ब्लूटुथ उपलब्ध आहे. त्याचबरोबर 4G आणि GPS सपोर्टसुद्धा मिळतो. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :