लावाने आपला फ्यूल F1 स्मार्टफोनचा नवीन प्रकार लाँच केला आहे, ज्याचे नाव आहे लावा आयरिश फ्यूल F2. ह्या स्मार्टफोनची किंमत आहे ४,४४४ रुपये, आणि हा एका ई-कॉमर्स वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध आहे. मात्र कंपनीकडून अजूनही ह्याला अधिकृतरित्या लाँच केले आहे. ह्याआधी कंपनीने ह्या स्मार्टफोनचा पहिला व्हर्जन लावा फ्यूल F1 लाँच केला होता, ज्याची किंमत होती ८७०० रुपये. ह्या स्मार्टफोनला मागील वर्षी ऑक्टोंबरमध्ये लाँच केले गेले होते.
लावा आयरिश फ्यूल F2 ड्यूल सिम आणि ड्यूल-स्टँड बाय सपोर्ट करतो. लावा आयरिश फ्यूल F2 अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालणारा स्मार्टफोन आहे. त्याचबरोबर ह्यात 5 इंचाची FWVGA 480×854 पिक्सेल रिझोल्युशनची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 196ppi आहे. स्मार्टफोनमध्ये क्वाड-कोर प्रोसेसर दिले गेले आहे, जो 1.3Ghz ची गती देतो. ह्यात 512MB ची रॅमसुद्धा आहे.
लावा आयरिश फ्यूल F2 स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात 0.3 मेगापिक्सेलचा VGA फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. फोनच्या कनेक्टिव्हिटी पर्यायाबाबत बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 3G, वायफाय 802.11 b/g/n, ब्लूटुथ 2.1, FM रेडियो, GPS आणि मायक्रो-एसडी कार्डचे सपोर्टसुद्धा दिले आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 3G, वायफाय 802.11 b/g/n, ब्लूटुथ 2.1, FM रेडियो, GPS आणि मायक्रो-USB सपोर्ट दिले गेले आहे. फोनमध्ये 3000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. कंपनीनुसार ह्याची बॅटरी १५.५ तासांचा टॉक टाइम (3G नेटवर्कवर) आणि 300 तासांचा स्टँडबाय टाइम देण्यास सक्षम आहे.
ह्याआधी कंपनीने ह्या स्मार्टफोनचा पहिला व्हर्जन लावा फ्यूल F1 लाँच केला होता, ज्याची किंमत होती ८७०० रुपये. ह्या स्मार्टफोनला मागील वर्षी ऑक्टोंबरमध्ये लाँच केले गेले होते. ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्याl ५ इंचाची FWVGA IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 196ppi आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा स्मार्टफोन 4000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – शाओमी Mi ब्लूटुथ स्पीकर: केवळ १,९९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे हे उत्कृष्ट स्पीकर
हेदेखील वाचा – वजनाने हलके आणि उत्कृष्ट ऑप्टिकल झूम असलेले दोन उत्कृष्ट डिजिटल कॅमेरे