मोबाईल निर्माता कंपनी लावाने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन आयरिश एटम सादर केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला कंपनीने आपल्या साइटवर लिस्ट केले आहे. कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ४,२४९ रुपये ठेवण्यात आली आहे.
लावा आयरिश एटम स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ४ इंचाची WVGA डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×800 पिक्सेल आहे. हा फोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 512MB रॅमने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन 8GB च्या अंतर्गत स्टोरेजसह सादर केला आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅश असलेला ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करेल. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये GPRS/एज, 3G, वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटुथ V2.0, FM रेडियो, मायक्रो-USB 2.0 आणि GPS/A-GPS यांचा समावेश आहे. ह्याचे परिमाण 125.5×63.2×9.65mm आणि वजन ११० ग्रॅम आहे. ह्यात 1550mAh ची बॅटरी दिली गेली आहे.