लावा P7 स्मार्टफोन लाँच

लावा P7 स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन 1.2Ghz 32 बिट्स क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB च्या अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

मोबाईल निर्माता कंपनी लावाने आपला नवीन स्मार्टफोन P7 सादर केला आहे. कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ५,४९९ रुपये ठेवली आहे. लावाने हा स्मार्टफोन ऑनलाइनसह ऑफलाइनसुद्धा सेलसाठी उपलब्ध होईल.

 

ह्या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे डिझाइन. ह्याला पर्ल फिनिश डिझाईनमध्ये सादर केले गेले आहे. तसेच ह्याला आणखी आकर्षक बनविण्यासाठी फोनच्या मध्यभागी एक मेटॅलिक फिनिश लाइन दिली आहे, जी एक खास कोटिंगसह सादर केली आहे.

जर लावा P7 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची FWVGA डिस्प्ले आहे. ही डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz 32 बिट्स क्वाडकोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

त्याचबरोबर ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहेय दोन्ही कॅमे-यांना LED फ्लॅश देण्यात आला आहे. कॅमे-यांसह चाइल्ड मोड आणि चंकल्स सारखे साउंड पर्यायसुद्धा दिले आहेत. कंपनीने लाइव फोटोसारखेही काही फीचर्स दिले आहेत.

लावा P7 स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. कंपनीने ह्यात अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 6.0 मार्शमॅलो अपडेट देण्याची घोषणा केली आहे. ह्यात 2000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी लावा P7 स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट दिला गेला आहे. त्याचबरोबर 3G, वायफाय आणि ब्लूटुसुद्धा आहे. हा फोन 900 मेगाहर्ट्ज बँडवर 3G सपोर्ट करण्यास सक्षम आहे. ह्या फोनमध्ये 12 भारतीय भाषांना सपोर्ट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा फोन पांढरा, निळा आणि सोनेरी अशा तीन रंगात उपलब्ध आहे.

हे देखील वाचा-  मोटोरोला १ फेब्रुवारीला लाँच करणार आपला मोटो X फोर्स स्मार्टफोन

हे देखील वाचा- मायक्रोसॉफ्ट 1 फेब्रुवारीला लाँच करणार आपला शेवटचा लुमिया फोन

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo