मोबाईल निर्माता कंपनी लावाने बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स आयरिश अॅटम आणि आयरिश अॅटम 3 सादर केले आहे. कंपनीने आयरिश अॅटमची किंमत ४,२४९ रुपये ठेवली आहे आणि आयरिश अॅटम 3 ची किंमत ४,८९९ रुपये आहे.
जर लावा आयरिश अॅटम स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 800×480 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 512MB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
त्याचबरोबर ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 3G, ब्लूटुथ, वायफाय आणि USB फीचर्स दिले गेले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1550mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
तर लावा आयरिश अॅटम 3 स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 854×480 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 512MB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. त्याचबरोबर ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 3G, ब्लूटुथ, वायफाय आणि USB फीचर्स दिले गेले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 2000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.