64MP कॅमेरासह नवा Lava Blaze X 5G फोन भारतात लाँच, बजेट किमतीत मिळतील Powerful फीचर्स
LAVA ने Lava Blaze X 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच
Lava Blaze X 5G तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला होता.
Lava Blaze X 5G फोनच्या सर्व व्हेरिएंटवर 1000 रुपयांची बँक सूट उपलब्ध
देशी स्मार्टफोन निर्माता LAVA ने Lava Blaze X 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन अनेक व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. Lava ने हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, कमी किमतीत हा फोन अनेक पॉवरफुल स्पेक्ससह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि MediaTek Dimensity प्रोसेसरची पॉवर आहे. जाणून घ्या Lava Blaze X 5G ची किंमत आणि सर्व फीचर्स-
Also Read: Latest Smartphones Under 20k: भारतात नव्याने लाँच झालेले स्मार्टफोन्स, Best ऑफर्ससह उपलब्ध
Lava Blaze X 5G ची किंमत
Lava Blaze X 5G फोनच्या बेस वेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज मिळेल. तर, फोनचा दुसरा व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. तर, त्याच्या तिसऱ्या आणि टॉप व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. लक्षात घ्या की, या फोनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. तर, फोनच्या दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपयांना उपलब्ध आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, विशेष लाँच किंमती अंतर्गत हा फोन 13,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी केला जाऊ शकतो. फोनच्या सर्व व्हेरिएंटवर 1000 रुपयांची बँक सूट उपलब्ध आहे. या फोनसह स्टारलाईट पर्पल आणि टायटॅनियम ग्रे कलर ऑप्शन्स उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची विक्री 20 जुलै रोजी Amazon वर मध्यरात्री 12 वाजता प्राइम डे सेलसह सुरू होईल.
Lava Blaze X 5G
Lava Blaze X 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसह येतो. हे Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोटोग्राफीसाठी डिव्हाइस ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. या फोनमध्ये 64MP Sony IMX682 सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे.
याव्यतिरिक्त, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.बॅटरीबद्दल बोलायचे झालास, Lava च्या या नवीन 5G फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. चार्जिंगसाठी हा फोन USB टाइप-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile