Lava Blaze Pro: 7GB RAM आणि 50MP कॅमेरासह लाँच, किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी

Lava Blaze Pro: 7GB RAM आणि 50MP कॅमेरासह लाँच, किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

Lava चा नवीन फोन Lava Blaze Pro लाँच

या नव्या स्मार्टफोनची किंमत 10,499 रुपये असण्याची शक्यता

फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

देशांतर्गत कंपनी Lava ने आपला नवीन फोन Lava Blaze Pro लाँच केला आहे. Lava Blaze Pro सह Dual 4G कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. याशिवाय, यात 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.5-इंच लांबीचा HD प्लस डिस्प्ले आहे. लावा ब्लेझ प्रोमध्ये 4 GB रॅमसह 3 GB व्हर्च्युअल रॅम आहे. लावाने या फोनसाठी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले आहे.

हे सुद्धा वाचा : आयुष्मान खुराना अभिनित 'Doctor G' चित्रपट 14 ऑक्टोबरला रिलीजसाठी सज्ज, ट्रेलर रिलीज

Lava Blaze Pro चे स्पेसिफिकेशन्स

Lava Blaze Pro मध्ये Android 12 सह 6.5-इंच 2.5D कर्व्ड IPS डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. यात MediaTek Helio G37 प्रोसेसरसह 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे. यात 3 GB व्हर्चुअल रॅम देखील मिळेल. 

तसेच, Lava Blaze Pro मध्ये 4G LTE, Bluetooth v5.0, Wi-Fi, OTG, 3.5mm ऑडिओ जॅक आणि GPS आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर व्यतिरिक्त, यामध्ये फेस अनलॉक देखील आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

याव्यतिरिक, फोनमध्ये तीन मागील कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे आणि मॅक्रो, पोर्ट्रेट, ब्यूटी, HDR, पॅनोरमा आणि QR कोड स्कॅनर सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

Lava Blaze Pro ची किंमत

Lava Blaze Proच्या 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेजची किंमत 10,499 रुपये आहे. Lava Blaze Pro 32 GB स्टोरेज वेरिएंट मध्ये देखील सादर करण्यात आला आहे. मात्र, कंपनीने त्याच्या किंमतीबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. Lava Blaze Pro ग्लास ब्लू, ग्लास ग्रीन गोल्ड आणि ग्लास ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo