Lava चा प्रीमियम दिसणारा स्वस्त फोन लवकरच होणार लाँच, जाणून घ्या संभावित फीचर्स

Updated on 18-Sep-2022
HIGHLIGHTS

Lava Blaze Pro स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार

कंपनीने अधिकृत ट्विटद्वारे आगामी स्मार्टफोनची घोषणा केली

50-मेगापिक्सेलच्या मुख्य सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध

Lava चा एक सुंदर स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. असे म्हटले जात आहे की हा फोन Lava Blaze Pro या नावाने पदार्पण करू शकतो. फोनची अधिकृत लाँच डेट आणि कलर पर्यायांचा तपशील समोर आला आहे. कंपनीने ट्विटमध्ये खुलासा केला आहे की, आगामी हँडसेट पुढील आठवड्याच्या सुरुवातीला बाजारात दाखल होईल. फोनचे नाव न घेता कंपनीने सांगितले की, हा स्मार्टफोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच  केला जाईल. तसेच, लावाने सोशल मीडिया पोस्टद्वारे खुलासा केला की, हँडसेट या आठवड्याच्या सुरुवातीलाच येईल.चला तर जाणून घेऊयात फोनचे संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स… 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! iPhone 12 मिळेल 40 हजार रुपयांपेक्षा स्वस्त, Amazon सेलमध्ये आकर्षक डिल उपलब्ध होणार

त्याच्या अधिकृत पृष्ठावरील अलीकडील ट्विटमध्ये, लावाने घोषणा केली आहे की त्याचा आगामी लावा स्मार्टफोन, 20 सप्टेंबर रोजी लॉन्च होईल. स्मार्टफोनसाठी चार कलर पर्याय टीज करण्यात आले आहेत. या रंगांची नावे जाहीर केली नसली तरी ते ब्लू, गोल्डन, मिंट ग्रीन और मस्टर्ड येलो या शेड्समध्ये असण्याची शक्यता आहे. टीझर व्हिडिओमध्ये 50-मेगापिक्सेलच्या मुख्य सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील दिसत आहे.

 

https://twitter.com/LavaMobile/status/1571033188847460352?ref_src=twsrc%5Etfw

 

लावाच्या आगामी स्मार्टफोनला या महिन्याच्या सुरुवातीला टीज करण्यात आले होते, जिथे कंपनीने देशात नवीन "प्रो" स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली होती. 'कमिंग सून' ही ट्विटही टॅगलाइनसह आली आहे. पोस्टर इमेज साइड-माउंट केलेल्या फिंगरप्रिंट स्कॅनरसह हँडसेट दाखवते. कंपनीने अद्याप मोनिकरची पुष्टी केलेली नसली तरी, हा फोन लावा ब्लेझ प्रो असू शकतो असा अंदाज लावला जात आहे.

GSMArena च्या अलीकडील अहवालात लावा ब्लेझ प्रो चे कथित रेंडर देखील लीक झाले होते.  रेंडर्स सूचित करतात की, हँडसेटच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात 50-मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा युनिट असेल. असे म्हटले जात आहे की, लावा ब्लेझ प्रो 6x झूमला सपोर्ट करतो. रिपोर्टनुसार, यात होल पंच कटआउटसह 6.5-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले असेल. यात 5000mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :