देशी कंपनीचा आगामी फोन Lava Blaze Pro 5G लवकरच भारतीय स्मार्टफोन बाजारात सादर केला जाऊ शकतो. कंपनीने आधीच फोनची घोषणा केली आहे, परंतु अद्याप फार तपशील उघड करण्यात आले नाहीत. परंतु, आता लेटेस्ट अपडेटमध्ये फोनचा फ्रंट पॅनल समोर आला आहे. नुकतेच लावा इंटरनॅशनलचे बिझनेस हेड सुनील रैना यांनी त्यांच्या सोशल मीडिया चॅनलद्वारे फोनचा टीझर उघड केला होता. तसेच, Lava Mobiles च्या अधिकृत X (ट्विटर) अकाउंटवरही याबद्दल पोस्ट शेअर करण्यात आले आहे. आता त्याचा फ्रंट पॅनलही समोर आला आहे.
https://twitter.com/LavaMobile/status/1702599167854731396?ref_src=twsrc%5Etfw
पोस्टमध्ये कंपनीने Lava Blaze Pro 5G ला 5G King अशी टॅगलाइन दिली आहे. मात्र, लीक आणि ऑनलाइन अपडेट्समध्ये त्याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. पण आता फोनचा फ्रंट डिझाईन देखील समोर आला आहे. Lava Blaze Pro 5G च्या फ्रंट पॅनलवर पंच होल कटआउटसह एक डिस्प्ले दिसत आहे. अद्याप फोनमध्ये नॉच स्पष्टपणे दिसत नाहीये. फोनच्या चिनवर बेझल्स दिसतात. फोनचा बिल्ट स्लिम आहे.
प्रसिद्ध , टिपस्टर अभिषेक यादवने त्याच्या सोशल मीडिया हँडलद्वारे फोनच्या मागील आणि पुढील दोन्ही पॅनलचे डिझाइन शेअर केले आहे. त्याबरोरबच, टिपस्टरने त्याची लाँच टाइमलाइन आणि किंमत देखील येथे उघड केली आहे. हा फोन लो-मिड रेंजमध्ये म्हणजेच 15 हजार रुपयांच्या जवळपास लाँच होण्याची शक्यता आहे. टिपस्टरनुसार, Lava Blaze Pro 5G लाँच पुढील आठवड्यात सादर होईल.
https://twitter.com/yabhishekhd/status/1704137758904590692?ref_src=twsrc%5Etfw
शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये फोनचा मागील पॅनल दाखवला आहे, जो पांढर्या ग्रेडियंट कलरमध्ये दिसत आहे. यामध्ये दोन उंचावलेल्या रिंग दिसत आहेत, ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, एक सेकंडरी कॅमेरा आणि एक LED फ्लॅश आहे.
याशिवाय फोनच्या प्रोसेसर आणि कॅमेऱ्याचीही माहिती इथे दिली आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 6020 चिपसेट असल्याचे सांगितले जात आहे. तर, डिव्हाइस मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरासह येऊ शकतो, त्यासोबत आणखी एक लेन्स देखील असेल.