digit zero1 awards

रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह Lava Blaze Pro 5G भारतात Launch, Affordable किमतीत आला नवा फोन

रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह Lava Blaze Pro 5G भारतात Launch, Affordable किमतीत आला नवा फोन
HIGHLIGHTS

Lava Blaze Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे.

या उपकरणाची विशेषता म्हणजे डिवाइस रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह येतो.

यात MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर सोबत 128GB अंतर्गत स्टोरेज आणि 8GB RAM आहे.

Lava Blaze Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या उपकरणाची विशेषता म्हणजे डिवाइसच्या मागील पॅनेलचा रंग बदलतो. बाकी या फोनची डिझाईन लावाच्या सध्याच्या इतर फोन्ससारखीच आहे. सुरळीत काम करण्यासाठी मीडियाटेकचा सुपर फास्ट प्रोसेसर देखील हँडसेटमध्ये देण्यात आला आहे. हे उपकरण Xiaomi, Samsung, Vivo आणि Oppo सारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोनला बजेट सेगमेंटमध्ये जोरदार स्पर्धा देणार आहे.

Lava Blaze Pro 5G स्मार्टफोनची किंमत

Lava Blaze Pro 5G स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या डिव्हाइसची पहिली विक्री 3 ऑक्टोबरपासून अधिकृत वेबसाइट आणि शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सुरू होईल.

LAVA BLAZE PRO 5G

Lava Blaze Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Lava Blaze Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचा 120Hz रिफ्रेश रेट आहे. यामध्ये यूजर्सना उत्तम पिक्चर क्वालिटी मिळेल. लावाचा नवीन स्मार्टफोन Android 13 आधारित ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. यात MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर सोबत 128GB अंतर्गत स्टोरेज आणि 8GB RAM आहे, जी 16GB पर्यंत वाढवता येते.

त्याबरोबरच, विशेष म्हणजे फोटोग्राफीसाठी, डिव्हाइसमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, जो EIS सपोर्टसह सुसज्ज आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. Lava Blaze Pro 5G फोन 5000mAh बॅटरीसह येईल, जो 33W फास्ट चार्जरच्या समर्थनासह येणार आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo