Lava Blaze Pro 5G लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. कंपनीने Lava Blaze Pro 5G ची लॉन्चिंग कन्फर्म केली आहे. Lava चे बिझनेस हेड आणि प्रेसिडेंट सुनील रैना यांनी देशात या फोनची लॉन्चिंग अनाऊंन्स केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने नुकतेच भारतात Blaze 2 Pro 4G लाँच केले आहे. आता त्याचे सक्सेसर म्हणून Blaze pro 5G आणले जात आहे, अशी माहिती मिळाली आहे.
https://twitter.com/reachraina/status/1701829973424722339?ref_src=twsrc%5Etfw
Lava चे बिझनेस हेड आणि प्रेसिडेंट सुनील रैना यांनी त्यांच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर खात्यावरून ट्विट करून Lava Blaze Pro 5G च्या भारतीय लाँचची पुष्टी केली आहे. मात्र, लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मात्र, या फेस्टिव्ह सीझनमध्ये हा फोन लाँच केला जाणार असल्याची पुष्टी झाली. कंपनी लवकरच स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा करण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन लीकद्वारे काही रिपोर्ट्सनुसार फोनचे काही विशेष स्पेसिफिकेशन्स उघड करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी, लोकप्रिय टिपस्टर अभिषेक यादव यांनी सांगितले होते की Lava सप्टेंबरच्या शेवटी भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. यामध्ये MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर दिला जाईल. Mediatek Dimensity 6020 चिपसेट गेमिंगसाठी योग्य आहे, असे म्हटले जाते.
ऑनलाईन लीकद्वारे या फोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स देखील उघड करण्यात आले आहेत. तुम्हाला लावाच्या नव्या फोनसह 50MP मेन कॅमेरा आणि त्यासह दुसरा सेन्सर देखील मिळू शकतो. त्याबरोबरच, यामध्ये LED फ्लॅश मिळण्याची देखील शक्यता आहे. या फोनची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. त्याला Lava Blaze Pro 5G असे नाव दिले जात होते. हा फोन व्हाईट किंवा सिल्वर कलरमध्ये येण्याची शक्यता आहे.