Lava Blaze Duo 5G Launched: देशी कंपनीचा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 18,000 रुपयांपेक्षा कमी
Lava Blaze Duo 5G स्मार्टफोन्स अखेर भारतीय बाजरात लाँच करण्यात आला आहे.
लाँच ऑफरअंतर्गत HDFC बँक कार्डद्वारे हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची सूट
Lava Blaze Duo 5G स्मार्टफोनध्ये फोटोग्राफीसाठी 64MP प्राथमिक कॅमेरा मिळेल.
Lava Blaze Duo 5G Launched: देशी स्मार्टफोन निर्माता Lava चा नवा Lava Blaze Duo 5G स्मार्टफोन्स अखेर भारतीय बाजरात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा फोन बजेट श्रेणीमध्ये सादर केला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन ड्युअल डिस्प्ले फीचरसह येतो. फोनच्या मागील बाजूस 1.58 इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. कमी किमतीत या फोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. जाणून घेऊयात फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
Lava Blaze Duo 5G ची किंमत आणि उपलब्धता
Introducing Blaze Duo: Live The DUO Life!
— Lava Mobiles (@LavaMobile) December 16, 2024
Special Launch Price: ₹14,999*
Sale Starts on 20th Dec, 12 PM | Only on Amazon
*Incl. Bank Offers #BlazeDuo #LiveTheDuoLife #LavaMobiles #ProudlyIndian pic.twitter.com/EGJ6JRTBGe
देशी स्मार्टफोन निर्माता Lava ने Lava Blaze Duo 5G फोन दोन व्हेरिएंटसह सादर केला आहे. या फोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. तर, फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon India वर हा फोन 20 डिसेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, लाँच ऑफरअंतर्गत, HDFC बँक कार्डद्वारे हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. या फोनमध्ये सेलेस्टियल ब्लू आणि आर्क्टिक व्हाईट असे दोन कलर ऑप्शन्सदेखील मिळतील.
Lava Blaze Duo 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Lava Blaze Duo 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz इतका आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 1.58 इंच लांबीचा AMOLED सेकंडरी डिस्प्ले देखील आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 7025 प्रोसेसरनद्वारे सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6GB + 6GB आणि 8GB + 8GB व्हर्च्युअल रॅम आणि 128GB इतके स्टोरेज आहे. तर, सुरक्षेसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
याव्यतिरिक्त, या स्मार्टफोनध्ये फोटोग्राफीसाठी 64MP प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, हा फोन LED फ्लॅशसह 2MP सेकंडरी डिस्प्लेसह येतो. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. या फोनची बॅटरी काही बेसिक कार्यांसह दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile