देशी कंपनी Lava चा नवीनतम स्मार्टफोन Lava Blaze Curve 5G भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, आकर्षक कर्व डिस्प्ले असलेला हा मिड रेंज स्मार्टफोन आहे. देशी कंपनीचे स्मार्टफोन भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय झाले आहेत. कमी किमतीत तुम्हाला या स्मार्टफोन्समध्ये पॉवरफुल फीचर्स मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात Lava Blaze Curve 5G स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Attractive ट्रान्सपरंट डिझाईनसह बहुप्रतीक्षित Nothing Phone 2a अखेर भारतात लाँच, किंमत बजेटमध्ये आहे का? Tech News
Lava ने Blaze Curve 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. ज्याच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. तर, त्याचे टॉप व्हेरिएंट म्हणजे 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 18,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. अशाप्रकारे हा स्मार्टफोन तुम्हाला अगदी माध्यम श्रेणीमध्ये मिळेल. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री अधिकृत वेबसाइट आणि Amazon India वर 11 मार्च 2024 पासून सुरू होईल.
Lava Blaze Curve या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. Lava ने उत्तम परफॉर्मन्ससाठी Blaze Curve मध्ये MediaTek Dimensity 7050 चिपसेट प्रदान केला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेज आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यामध्ये व्हर्च्युअल रॅमचाही सपोर्ट आहे. हा फोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP प्रायमरी सेन्सर, 2MP मॅक्रो लेन्स आणि 32MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. आकर्षक सेल्फीसाठी हँडसेटच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. Lava Blaze Curve मध्ये 5000mAh बॅटरी आहे जी जलद चार्जिंगला सपोर्ट करते.
फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स आहेत. त्याबरोबरच, यात डॉल्बी ATMOS सोबतच फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देखील आहे.