Lava Blaze Curve 5G नावाने हा नवीनतम फोन लाँच होणार आहे.
Lava Blaze Curve स्मार्टफोन भारतात 5 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल.
Lava Blaze Curve ची किंमत 16,000 रुपये ते 19,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.
भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava पुढील महिन्यात भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन लाँच करण्यास सज्ज झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Lava Blaze Curve 5G नावाने हा नवीनतम फोन लाँच होणार आहे. लक्षात घ्या की, आगामी स्मार्टफोन कंपनी मिड-रेंजमध्ये सादर करणार आहे. या हँडसेटची मायक्रोसाइट आधीच Amazon वर लाइव्ह आहे. जाणून घेऊयात आगामी Lava Blaze Curve 5G बद्दल सर्व डिटेल्स-
Lava Blaze Curve स्मार्टफोन भारतात 5 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. टीझर्सनी आधीच सुचवले आहे की, मिड-रेंजरमध्ये सेंटर अलाइन्डपंच-होल कटआउटसह कर्व डिस्प्ले असेल. तसेच उजव्या बाजूला व्हॉल्यूम आणि पॉवर बटन्स असणे अपेक्षित आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, असे देखील टीझर सूचित करतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, Lava Blaze Curve ची किंमत 16,000 रुपये ते 19,000 रुपयांच्या दरम्यान ठेवली जाण्याची शक्यता आहे.
Lava Blaze Curve 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
प्रसिद्ध टिपस्टरने संभाव्य पहिल्या झलकसह काही लीक फीचर्स देखील उघड केली आहेत. लीकनुसार, Lava Blaze Curve 5G ला 120Hz रिफ्रेश रेट पॅनेलसह 6.78-इंच लांबीचा AMOLED फुल HD+ डिस्प्ले मिळू शकतो. अप्रतिम परफॉर्मन्ससाठी या फोनसह डायमेंसिटी 7050 चिपसेट मिळणार आहे. हा हँडसेट 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळेल.
याशिवाय, फोटोग्राफीसाठी फोनचा कॅमेरा देखील लीक झाला आहे. हा स्मार्टफोन अल्ट्रावाइड सेन्सरसह 64MP प्रायमरी शूटरसह प्रदान केला जाऊ शकतो. तसेच, सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, हे डिव्हाइस 5000mAh बॅटरीसह येण्याची शक्यता आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.