Lava ने गेल्या महिन्यात झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2022 कार्यक्रमात आपल्या नवीन हँडसेट Lava Blaze 5G ची घोषणा केली. कंपनीने त्यावेळी दावा केला होता की, हा भारतातील सर्वात परवडणारा 5G स्मार्टफोन असेल. मात्र, कंपनीने अद्याप त्याची किंमत जाहीर केलेली नाही. आता Lava ने पुष्टी केली आहे की, फोन 3 नोव्हेंबर रोजी Amazon India वर लाँच होणार आहे. Lava Blaze 5G ड्यू ड्रॉप स्टाइल नॉचसह येतो. चला तर मग या फोनचा तपशील सविस्तरपणे बघुयात…
हे सुद्धा वाचा : Google ने Play Store वरून 13 धोकादायक ऍप्सची केली सुट्टी, तुमच्या फोनमधून त्वरीत डिलीट करा
फोनमध्ये, कंपनी 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच लांबीचा HD + LCD पॅनेल देत आहे. हा 2.5D कर्व्ड डिस्प्ले आहे, जो 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लावाचा हा फोन 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल. विशेष बाब म्हणजे कंपनी यामध्ये 3 GB व्हर्च्युअल रॅम देखील देणार आहे. यासह, या फोनची एकूण रॅम 7 GB पर्यंत जाते.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये डेप्थसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी कंपनी यामध्ये 5000mAh बॅटरी देणार आहे.
फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. कनेक्टिव्हिटीसाठी यात USB टाइप-C पोर्ट, एकाधिक 5G बँड सपोर्ट, 4G VoLTE, ड्युअल बँड Wi-Fi आणि ब्लूटूथ 5.1 सारखे पर्याय मिळतील. रिपोर्ट्सनुसार, फोनची किंमत सुमारे 10 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.