Lavaचा 50MP कॅमेरासह सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होणार, लाँच डेट जाहीर

Lavaचा 50MP कॅमेरासह सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होणार, लाँच डेट जाहीर
HIGHLIGHTS

Lava Blaze 5G ची लॉन्च डेट जाहीर

हा फोन 7 नोव्हेंबर रोजी Amazon India वर लॉन्च केला जाईल.

लावाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल @LavaMobiles वरून ट्विट केले आहे.

Lava Blaze 5G कंपनीच्या बहुप्रतीक्षित फोनची लाँच डेट जाहीर झाली आहे. कंपनीने हा फोन गेल्या महिन्यात इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 मध्ये शोकेस केला होता. यापूर्वी लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, हा फोन 3 नोव्हेंबरला लॉन्च केला जाईल. मात्र, तसे झाले नाही. आता कंपनीने ट्विट करून Lava Blaze 5G च्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. लावाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल @LavaMobiles वरून ट्विट केले आहे की, हा फोन 7 नोव्हेंबर रोजी Amazon India वर लॉन्च केला जाईल.

हे सुद्धा वाचा : भारीच की! Dish TV ने आणले 11 OTT ऍप्ससह 4 नवीन प्लॅन, 1 महिना सर्व्हिस मोफत

Lava Blaze 5G 

फोनमध्ये, कंपनी 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच लांबीचा HD + LCD पॅनेल देणार आहे. हा डिस्प्ले टियरड्रॉप नॉच डिझाइनसह येईल आणि त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. डिस्प्लेचे खास फिचर म्हणजे ते 90Hz च्या रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करेल. संपूर्ण 7GB पर्यंत RAM येईल. कंपनी फोनमध्ये 128 GB इंटरनल स्टोरेज देणार आहे.

प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देणार आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह येईल. 

हा स्मार्टफोन देशातील सर्वात परवडणारा 5G हँडसेट असू शकतो. त्याची किंमत सुमारे 10 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. हा फोन ब्लू आणि ग्रीन कलरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo