digit zero1 awards

भारीच की! Lava Blaze 2 Pro भारतात दाखल, प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे फोनची किमंत

भारीच की! Lava Blaze 2 Pro भारतात दाखल, प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे फोनची किमंत
HIGHLIGHTS

Lava Blaze 2 Pro 4G नवीन बजेट स्मार्टफोन भारतात लाँच

Lava Blaze 2 Pro ची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Lavaच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.

Lava Blaze 2 Pro 4G नवीन बजेट स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. यापूर्वी, Lava ने यावर्षी एप्रिलमध्ये Lava Blaze 2 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला होता. या फोनची किंमत 9 हजारांपेक्षा कमी आहे. लाँचच्या वेळी या स्मार्टफोनची बरीच चर्चा झाली होती. यात व्हर्च्युअल रॅम आणि युनिसॉक चिपसेट सारखी फीचर्स आहेत. हे उपकरण मध्यम श्रेणीतील Redmi, Vivo आणि Oppo सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल, असे म्हटले जात आहे. 

Lava Blaze 2 Pro ची किंमत 

Lava Blaze 2 Pro ची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीत फक्त 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. हा फोन ऑफलाइन स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

lava blaze 2 pro

Lava Blaze 2 Pro 

Lava Blaze 2 Pro मध्ये 6.5 इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 720 × 1600 पिक्सेल आहे, रिफ्रेश दर 90Hz आहे. IPS डिस्प्ले स्क्रीन वेगवेगळ्या वातावरणात (थेट सूर्यप्रकाश, कमी प्रकाश, घरामध्ये किंवा बाहेर) बेस्ट कॉलिटी ऑफर करतात.  सुरळीत काम करण्यासाठी, हँडसेटमध्ये UNISOC T616 सह Mali G57 GPU आहे. T606 चिपसेट समान श्रेणीतील इतर चिपसेटपेक्षा सर्वोत्तम गेमिंग परफॉर्मन्स देत आहे

 याशिवाय, मोबाइलमध्ये व्हर्च्युअल रॅमसह 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. त्याच वेळी, हा फोन Android 12 वर काम करतो. Lavaच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे.

Lava Blaze 2 Pro स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो. सामान्य कार्यांसह ही बॅटरी दोन दिवस टिकू शकते. हे 18W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज केले जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल-सिम कार्ड स्लॉट, Wi-Fi, GPS, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo