देशी कंपनी Lava ने आपल्या blaze सिरीजचा नवं फोन Lava blaze 2 भारतात लाँच केला आहे. हा फोन Lava blaze 5G चा अपग्रेडेड वर्जन म्हणून लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्लास बॅक डिझाईन मिळेल. तसेच, हा फोन ग्राहकांच्या खिशाला परवडणारा फोन आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत –
Lava च्या या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचचा कर्व HD प्लस IPS डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये ऑक्टॅकोर युनिसॉक T616 प्रोसेसरसह 6GB पर्यंत रॅम मिळेल, जी वरच्युअल रॅमसह 11GB पर्यंत वाढवता येईल. त्याबरोबरच, 128GB स्टोरेज देखील दिली गेली आहे. फोन अँड्रॉइड 13 सह सादर करण्यात आला आहे.
त्याबरोबरच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरोटीसाठी यात साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, ऑडियो जॅक आणि USB टाईप C सपोर्ट दिला आहे. .
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रीयर कॅमेरा सेटअप आहे. ज्याचा मेन कॅमेरा 13MP चा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
Lava blaze 2 च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 8,999 रूपये आहे. फोन 18 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजतापासून Amazon वर उपलब्ध होईल. फोन तुम्हाला ग्लास ब्लॅक, ग्लास ऑरेंज आणि ग्लास ब्लू रंगात खरेदी करता येईल.