त्याची किंमत 8,999 रुपये सूचिबद्ध करण्यात आली आहे.
फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगसह येते.
अलीकडेच देशी कंपनीचा बजेट स्मार्टफोन Lava Blaze 2 भारतात लाँच झालेला आहे. त्यानंतर आज पासून हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजतापासून Amazon वर Lava Blaze 2 ची सेल सुरु आहे. एकाच व्हेरिएंटमध्ये येणार हा हँडसेट एक बजेट फोन आहे.
Lava Blaze 2 ची किंमत
Lava ने हा बजेट स्मार्टफोन एकाच प्रकारात म्हणजेच 6GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला आहे. त्याची किंमत 8,999 रुपये सूचिबद्ध करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ग्लास ब्लू आणि ग्लास ऑरेंज कलरमध्ये दोन कलर व्हेरियंटमध्ये येतो. येथून खरेदी करा
Lava Blaze 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Lava स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो HD+ रिझोल्यूशन देतो. त्याबरोबरच डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये ऑक्टा-कोर Unisoc T616 चिपसेट वापरण्यात आला आहे. हँडसेट 6GB RAM आणि 5GB व्हर्च्युअल रॅमसह येतो. तसेच, यात 128 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगसह येते. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आहे आणि सेकंडरी कॅमेरा 2MP चा आहे. त्याबरोबरच, 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरासुद्धा तुम्हाला मिळणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.