LAVA Blaze 2 5G ची किंमत फक्त 9,999 रुपयांपासून सुरू होते.
हा स्वस्त 5G फोन 9 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
भारतीय स्मार्टफोन ब्रँड Lava Mobiles ने आज आपला नवीन 5G फोन भारतात सादर केला आहे. LAVA Blaze 2 5G कंपनीने भारतात लाँच केला आहे. हा लो बजेटचा 5G स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत फक्त 9,999 रुपयांपासून सुरू होते. 50MP कॅमेरा, 6GB RAM आणि 5,000mAh बॅटरी असलेल्या या स्वस्त 5G फोनची किंमत आणि फीचर्सबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.
Lava Blaze 2 5G ची किंमत
Lava Blaze 2 5G फोन दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4GB + 64GB स्टोरेज असलेल्या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर, LAVA Blaze 2 5G ची किंमत 6GB RAM + 128GB स्टोरेज 10,999 रुपये आहे. हा स्वस्त 5G फोन 9 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Lava Blaze 2 5G
6.5 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन IPS LCD पॅनेलवर बनवली आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. LAVA Blaze 2 5G फोनमध्ये MediaTek Dimension 6020 octacore प्रोसेसर आहे. त्याबरोबरच, हा फोन Android 13 वर लाँच झाला आहे. सुरक्षेसाठी, फोनच्या बाजूच्या फ्रेमवर फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला आहे, तर हा मोबाइल फॅन अनलॉक फीचरलाही सपोर्ट करतो.
मोबाईल फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज असलेला 50MP चा प्रायमरी सेन्सर आहे, जो 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह कार्य करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन 8MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. फोन 5,000 mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानही देण्यात आले आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.