LAVA चा स्वस्त 5G फोन भारतात होणार लाँच, कंपनीकडून Blaze 2 5G टीजर जारी, बघा काय मिळेल विशेष! 

LAVA चा स्वस्त 5G फोन भारतात होणार लाँच, कंपनीकडून Blaze 2 5G टीजर जारी, बघा काय मिळेल विशेष! 
HIGHLIGHTS

लवकरच भारतात LAVA Blaze 2 5G फोन लाँच होणार

Lava India ने आगामी Blaze 2 5G चा टीझर व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

लावाने त्याच्या पुढील 5G ​​फोनला 'लॉर्ड ऑफ 5G' हॅशटॅगसह टीज केले आहे.

भारतीय स्मार्टफोन ब्रँड Lava ने एप्रिल महिन्यात त्यांच्या ‘Blaze’ सिरीज अंतर्गत LAVA Blaze 2 सादर केला होता. हा स्मार्टफोन बजेट विभागात लाँच करण्यात आला होता, ज्याची किंमत केवळ 8,999 रुपये आहे. दरम्यान, आता कंपनी या स्वस्त मोबाईल फोनचे 5G व्हर्जन आणणार आहे. होय, ब्रँडने घोषणा केली आहे की, ते लवकरच भारतात LAVA Blaze 2 5G फोन लाँच करणार आहेत. एवढेच नाही तर, Lava India ने आगामी Blaze 2 5G चा टीझर व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

हे सुद्धा वाचा: iPhone 13 Discount: ‘या’पेक्षा स्वस्तात परत अजिबात मिळणार नाही, Amazon सेलमध्ये मिळतेय Best डील

LAVA Blaze 2 5G इंडिया टीझर लाँच

लावा कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे Blaze 2 5G लॉन्चला टीज केले आहे. कंपनीने अद्याप या फोनची लाँच डेट जाहीर केलेली नाही. परंतु हे निश्चितपणे स्पष्ट केले आहे की, हा मोबाईल लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. लावाने त्याच्या पुढील 5G ​​फोनला ‘लॉर्ड ऑफ 5G’ हॅशटॅगसह टीज केले आहे.

आगामी स्मार्टफोनचा फर्स्ट लुक

कंपनीने फोनची एक छोटी व्हिडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. या टीझर व्हिडिओमध्ये, हे समोर आले आहे की, Lava Blaze 2 5G फोनच्या मागील पॅनलवर एक गोल-आकारा म्हणजेच राउंड शेपचा मागील कॅमेरा सेटअप मध्यभागी दिला जाईल. अशीच डिझाईन अलीकडेच लाँच झालेल्या लोकप्रिय LAVA AGNI 2 5G फोनमध्ये देखील देण्यात आली आहे. फोनमध्ये एक राउंड एज पंच-होल डिस्प्ले देखील दिसणार आहे. याशिवाय, फोनमध्ये फ्रेमवर 3.5 मिमी जॅक, USB टाइप-C पोर्ट आणि स्पीकर देखील असतील.

LAVA Blaze 2 4G चे तपशील

LAVA BLAZE 2
LAVA BLAZE 2

LAVA Blaze 2 स्मार्टफोन पंच-होल डिझाइन केलेल्या डिस्प्लेवर तयार केला आहे. फोनमध्ये 6.5 इंच लांबीची HD+ स्क्रीन आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटवर काम करते. Lava Blaze 2 मध्ये Unisoc T616 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा लावा मोबाईल 5GB व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो, ज्याच्या मदतीने अंतर्गत 6GB रॅम 11GB पर्यंत वाढवता येते.

हा लावा मोबाईल फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज 13MP चा प्रायमरी सेन्सर दिला जातो, जो सेकंडरी AI लेन्ससह कार्य करतो. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी मोठी 5,000 mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo