Lava Agni 3 Sale: ड्युअल डिस्प्लेसह येणाऱ्या लेटेस्ट स्मार्टफोनवर ऑफर्सचा वर्षाव, जाणून घ्या किंमत आणि विशेषता 

Lava Agni 3 Sale: ड्युअल डिस्प्लेसह येणाऱ्या लेटेस्ट स्मार्टफोनवर ऑफर्सचा वर्षाव, जाणून घ्या किंमत आणि विशेषता 
HIGHLIGHTS

Lava Agni 3 5G ची पहिली सेल आज म्हणजेच 9 ऑक्टोबरपासून सुरू

Lava Agni 3 दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Lava Agni 3 फोन 'India’s 1st dual AMOLED Display' स्मार्टफोन आहे.

देशी कंपनी Lava चा नवीनतम स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. होय, नवा Lava Agni 3 5G कंपनीने गेल्या आठवड्यात मिड-रेंज सेगमेंट अंतर्गत सादर केला आहे. कंपनीने हा फोन अतिशय वेगळ्या विशेषतांसोबत लाँच केला आहे. हा फोन ‘India’s 1st dual AMOLED Display’ स्मार्टफोन आहे. दरम्यान, लेटेस्ट Lava Agni 3 5G फोनची पहिली सेल आज म्हणजेच 9 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Lava Agni 3 5G ची किंमत आणि पहिल्या सेलमधील ऑफर्स-

Lava Agni 3 first sale
Lava Agni 3 first sale

Lava Agni 3 ची किंमत आणि ऑफर्स

Lava Agni 3 स्मार्टफोन आज दुपारी 12:00 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने नवा फोन 8GB/128GB स्टोरेज आणि 8GB/256GB अशा दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून दिला आहे. चार्जरशिवाय, हा फोन 20,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, चार्जरसह या फोनच्या 128GB वेरिएंटची किंमत 22,999 रुपये आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये असेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Amazon आणि लावा ई-स्टोअरद्वारे खरेदी करता येईल.

Lava Agni 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, Lava Agni 3 हा ड्युअल AMOLED डिस्प्ले असलेला पहिला फोन आहे. फोनचा प्रायमरी डिस्प्ले 6.78-इंच लांबीचा आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह 1.5K 3D कर्व AMOLED अनुभव देतो. तर, सेकंडरी डिस्प्ले 1.74-इंच लांबीचा AMOLED आहे, जो युजर्सना मागील कॅमेरासह नोटिफिकेशन्स व्यवस्थापित करण्यास आणि सेल्फी घेण्यास देखील अनुमती देतो. फोनमध्ये MediaTek Dimension 7300X प्रोसेसर उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये OIS + EIS सह 50MP प्रायमरी सेन्सर, 3X ऑप्टिकल झूम + EIS सह 8MP टेलिफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी EIS सह 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo