Lava Agni 2s लवकरच भारतात लवकरच होणार लाँच! बघा कधी होणार Entry, तुमच्या बजेटमध्ये असेल का किंमत? 

Lava Agni 2s लवकरच भारतात लवकरच होणार लाँच! बघा कधी होणार Entry, तुमच्या बजेटमध्ये असेल का किंमत? 
HIGHLIGHTS

कंपनीचा आगामी फोन Lava Agni 2S लवकरच भारतात होणार लाँच

या नवीनतम फोनमध्ये देखील तुम्हाला Lava Agni 2 सारखेच स्पेक्स मिळणार आहेत.

Lava Agni 2 च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत 21,999 रुपये

Lava Agni 2 स्मार्टफोन याच वर्षी म्हणेजच मे 2023 महिन्यात लाँच करण्यात आला होता. मात्र, आता कंपनी नवीन स्मार्टफोन लाँच करण्याचा विचार करत असल्याचे समोर येत आहे. हा फोन Lava Agni 2S नावाने लाँच केला जाऊ शकतो. हे दोन्ही स्मार्टफोन एकाच सिरीजमधील आहेत. हा स्मार्टफोन याच महिन्यात लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रसिद्ध टिपस्टर Yogesh Brar यांच्यावर विश्वास ठेवला तर Lava येत्या काही आठवड्यांमध्ये Lava Agni 2S लाँच करेल. या आगामी आणि नवीनतम फोनचे बरेच स्पेक्स Lava Agni 2 सारखेच असणार आहेत. मात्र, या दोन फोनमध्ये काही फरक देखील दिसण्याची अपेक्षा आहे.उदाहरणार्थ, या फोनमध्ये तुम्हाला वेगळा प्रोसेसर मिळणार आहे.

Lava Agni 2S could soon launch in India with specs similar to Agni 2: Here's when

हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy S23 FE स्पेशल एडिशन स्मार्टफोन लाँच, मिळेल तब्बल 10 हजार रुपयांपर्यंत Discount। Tech News

Lava Agni 2S स्मार्टफोन बद्दल अजून जास्त माहिती समोर आलेली नाही. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे, हा स्मार्टफोन Lava Agni 2 शी लिंक केला जात आहे. या नवीनतम फोनमध्ये देखील तुम्हाला Lava Agni 2 सारखेच स्पेक्स मिळणार आहेत. याशिवाय, आगामी फोनची किंमत देखील लावा अग्नि 2 इतकी असण्याची अपेक्षा केली जात आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की Lava Agni 2 च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे.

Lava Agni 2S could soon launch in India with specs similar to Agni 2: Here's when

Lava Agni 2

या Lava फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोन 256GB स्टोरेजसह 8GB रॅमने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, डिव्हाइस Android 13 वर कार्य करतो.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनला 50MP मुख्य कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सरसह येतो. त्यासोबतच, फोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरासह येतो. यात 66W फास्ट चार्जिंगसह 4700mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo