Lava Agni 2 5G भारतीय बाजारपेठेत या वर्षी म्हणजेच 2023 मे महिन्यात लाँच करण्यात आला होता. लाँच होताच या फोनने बजेट विभागातील ग्राहकांची बरीच पसंती मिळावी होती. त्यानंतर, कंपनीच्या आगामी Lava Agni 2S ची चर्चा सुरु झाली आहे. त्याबरोबरच, आता एका टिपस्टरने दावा केला आहे की, कंपनी आपले नवीन Agni 2S मॉडेल सादर करू शकते. या फोनचे अनेक तपशील देखील समोर आले आहेत.
हे सुद्धा वाचा: OnePlus युजर्ससाठी Good News! ‘या’ लोकप्रिय सिरीजमध्ये आजपासून मिळेल Android 14 अपडेट, काय मिळेल विशेष? Tech News
अलीकडेच समोर आलेल्या एका अहवालानुसार पुढे आले आहे की, Lava Agni 2S भारतात नोव्हेंबर म्हणजेच याच महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. हा फोन एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. हे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसह दिले जाऊ शकते. मात्र, फोनबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.
या फोनमध्ये MediaTek Dimension 7050 SoC आणि 66W वायर्ड फास्ट-चार्जिंग सपोर्ट आहे. यासोबतच 4700mAh ची बॅटरी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, फोनमध्ये 6.78-इंच फुल-HD + AMOLED डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी 7050 प्रोसेसर, 50MP क्वाड रियर कॅमेरा युनिट देखील मिळण्याची शक्यता आहे.
Lava Agni 2 5G मध्ये 6.78 इंच फुल- HD + कर्व AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. फोनमध्ये HDR10+ सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंशन 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, यामध्ये मागील बाजूस क्वाड-कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स, 2MP मॅक्रो सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे. फोनच्या पुढील बाजूस 16MP सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच, फोनला पॉवर देण्यासाठी यात 4700mAh बॅटरी 66W वायर्ड फास्ट चार्जिंगसह दिली गेली आहे.