Lava Agni 2 5G भारतीय बाजारपेठेत मे 2023 मध्ये लाँच करण्यात आला. या स्मार्टफोनला खूप पसंती मिळाली होती, ज्यामुळे लाँच झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. आता हा लावा स्मार्टफोन पुन्हा ई-कॉमर्स साइट Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. येथे आम्ही तुम्हाला Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि त्यावर उपलब्ध डिल्सबद्दल माहिती देणार आहोत.
Lava ने Twitter वर घोषणा केली आहे की, फोन 5 सप्टेंबर 2023 रोजी पुन्हा सेलसाठी आणला जात आहे. ई-कॉमर्स साइट Amazon वर आज सकाळी 10 वाजता सेल सुरू झाली. Lava 5G फोनच्या 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे, तर बँक ऑफरनंतर तो 19,999 रुपयांना खरेदी करता येईल.
स्मार्टफोनची किंमत कमी करण्यासाठी कंपनीने HDFC आणि SBI बँकेच्या ग्राहकांसाठी 2,000 रुपयांची सूट उपलब्ध करून दिली आहे.
Lava Agni 2 5G मध्ये 6.78 इंच फुल- HD + कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2220×1080 पिक्सेल आहे, रिफ्रेश रेट 120 Hz आहे. हा स्मार्टफोन octa core MediaTek Dimension 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर काम करतो. MediaTek Dimensity 7050 मध्यम श्रेणीच्या स्मार्टफोन्ससाठी स्पर्धात्मक कामगिरी, रॅपिड ऍप रिस्पॉन्स आणि गेमिंग क्षमता प्रदान करतो. सुरक्षेसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50 MP चा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 66W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करणारी 4,700mAh बॅटरी आहे.