स्मार्टफोन निर्माता Lava ने मे महिन्यात आपला Lava Agni 2 5G भारतीय बाजारात लाँच केला होता. हा स्मार्टफोन सशक्त फीचर्ससह बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. तर, आता या ब्रँडने सणासुदीच्या काळात एक नवीन ऑफर शेअर केली आहे. ज्यामध्ये तुम्ही फक्त 99 रुपयांमध्ये हा मोबाईल प्री-बुक करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता प्री-बुकिंग, किंमत आणि फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.
हे सुद्धा वाचा: Oppo A18 कंपनीचा नवीन Affordable स्मार्टफोन भारतात लाँच, फोनच्या खरेदीसह विशेष विजेत्यांना Enco Buds 2 मोफत
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लावा मोबाईलच्या अधिकृत हँडलवरून Lava Agni 2 5G ची माहिती समोर आली आहे. तुम्ही पोस्टमध्ये पाहू शकता की, Lava Agni 2 5G डिव्हाइस 99 रुपयांच्या किंमतीत प्री-बुक करता येईल.
मोबाइलचे प्री-बुकिंग करण्यासाठी Amazonच्या Amazon Pay प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागेल. फोनची विक्री 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:00 वाजल्यापासून फक्त Amazon प्राइम सदस्यांसाठी होईल. तर सामान्य वापरकर्ते 8 ऑक्टोबरपासून डिव्हाइस खरेदी करू शकतात. लक्षात घ्या की, Lava Agni 2 5G ची ही ऑफर केवळ मर्यादित स्टॉक उपलब्ध असेपर्यंतच देण्यात आली आहे.
कंपनीने Lava Agni 2 5G ला केवळ एका व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. डिव्हाइसच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी SBI बँक कार्डवर 2,000 रुपयांची बँक सवलत देणार आहे. याशिवाय, डिव्हाइसवर नो कॉस्ट EMI आणि सामान्य EMI पर्याय देखील उपलब्ध असतील.
Lava Agni 2 5G मध्ये 6.78 इंच फुल HD+ कर्व्ह AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz आहे. कंपनीने सर्वोत्तम कामगिरीसाठी डिव्हाइसमध्ये MediaTek डायमेंसिटी 7050 प्रोसेसर दिला आहे. मोबाईलमध्ये 8GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देखील आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला फोनसह एकूण 16GB रॅम सपोर्ट मिळेल. ऑपरेटिंग सिस्टम बद्दल बोलायचे झाल्यास हा मोबाईल Android 13 वर चालतो. याव्यतिरिक्त, फोन ड्युअल सिम 5G, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ, Wi-Fi यांसारख्या फीचर्सने सुसज्ज आहे.
Lava Agni 2 5G फोनमध्ये 470 mAh बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, हे उपकरण केवळ 16 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होईल. त्याबरोबरच, डिव्हाइस क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा लेन्स आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. हे 8MP + 2MP आणि 2MP लेन्ससह सुसज्ज आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.