फोनच्या 8GB रॅमसह 256GB स्टोरेजची किंमत 21,999 रुपये
फोन फक्त 16 मिनिटांत 0 ते 50 टक्के चार्ज होईल, असा कंपनीचा दावा
भारतीय मोबाईल कंपनी लावाने आपला नवीन 5G फोन लाँच केला आहे. हा मोबाईल Lava Agni 2 5G नावाने भारतात लाँच झाला आहे. हा फोन 2021 मधील Agni 5G फोनची प्रगत आणि पुढील पिढीतील म्हणजेच जनरेशनमधील आवृत्ती आहे. Agni 5G फोन 15,990 रुपयांना Amazon वर उपलब्ध आहे. Lava Agni 2 5G प्रीमियम लुकसह सादर करण्यात आला आहे. वेळ न घालवता या फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेक्स बघुयात –
किंमत आणि उपलब्धता
Lava Agni 2 5G फोन भारतीय बाजारात फक्त सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. याच्या 8GB रॅमसह 256GB स्टोरेजची किंमत 21,999 रुपये आहे. या फोनची विक्री 24 मे पासून Amazon India या शॉपिंग साइटवर सुरू होणार आहे. कंपनी निवडक बँक कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास 2,000 रुपयांची सूट देखील देणार आहे.
Lava Agni 2 5G चे तपशील
कंपनीने हा मोबाईल फोन कर्व्ड एज डिस्प्लेसह सादर केला आहे. फोनमध्ये 6.78 इंच फुल HD + स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. Lava Agni 2 5G नवीनतम Android 13 OS सह लाँच करण्यात आला आहे. त्याबरोबरच, हा फोन MediaTek Dimensity 7050 octa-core प्रोसेसरवर काम करतो.
याव्यतिरिक्त, या फोनमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅम आहे, तर वर सांगितल्याप्रमाणे 8GB रॅमसह 256GB स्टोरेज मिळेल. फोनमध्ये 4,700 mAh बॅटरी आहे, जी 66W फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येईल. फोन फक्त 16 मिनिटांत 0 ते 50 टक्के चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे.
कॅमेरा बद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नॉलजीसह येईल. तर, 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सपोर्ट आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.