मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी लावाने बाजारात आपला नवीन फोन A59 लाँच केला आहे. कंपनीनेे बाजारात ह्या स्मार्टफोनची किंमत ४,१९९ रुपये ठेवली आहे. हा फोन काळ्या आणि पांढ-या रंगात उपलब्ध होईल. सध्यातरी कंपनीने ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट केले आहे. तथापि, ह्याच्या उपलब्धतेविषयी अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
ह्या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंचाची FWVGA TFT डिस्प्ले देण्यात आली आहे, ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 800×480 पिक्सेल आहे. फोनमध्ये 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर आहे. फोन 512MB रॅमसह लाँच केला आहे. हा 4GB च्य अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ह्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि एक VGA फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. दोन्ही कॅमेरे फ्लॅशसह येतात. फोनमध्ये 1750mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 3G, वायफाय, ब्लूटुथ आणि 3.5mm जॅक सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय दिले आहेत. हा फोन अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
हेदेखील वाचा – स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरने सुसज्ज असलेला HTC 10 स्मार्टफोन भारतात लाँच
हेदेखील वाचा – 4GB रॅमने सुसज्ज असलेला सॅमसंग गॅलेक्सी C5 स्मार्टफोन लाँच