प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने Xiaomi 15 सिरीज अखेर लाँच केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून Xiaomi च्या या स्मार्टफोन सिरीजच्या लाँचची चर्चा टेक विश्वात सुरु आहे. कंपनीने अखेर आता ही सिरीज लाँच केली. या सिरीजअंतर्गत Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro सादर करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या वर्षी लाँच झालेल्या Xiaomi 14 सीरीजच्या तुलनेत या फोनमध्ये कॅमेरा, बॅटरी आणि अपग्रेडेड चिपसेट आहे. विशेष म्हणजे हा फोन Qualcomm च्या लेटेस्ट Snapdragon 8 Elite प्रोसेसरद्वारे सज्ज आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: Diwali Gift Ideas: दिवाळीला प्रियजनांना गिफ्ट करा ‘हे’ बेस्ट टेक गॅजेट्स, परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने सध्या चीनमध्ये Xiaomi 15 सीरीज लाँच केली आहे. Xiaomi 15 ची सुरुवातीची किंमत 4,499 युआन म्हणजेच अंदाजे 52,977 रुपये इतकी आहे. ही किंमत फोनच्या 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. तर, Xiaomi 15 Pro ची प्रारंभिक किंमत CNY 5,299 म्हणजेच अंदाजे 62,404 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये लिलाक पर्पल, लाईट ग्रास ग्रीन, ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शन्स आहेत. लवकरच ही स्मार्टफोन सिरीज भारतीय बाजारात लाँच केली जाईल.
Xiaomi 15 स्मार्टफोनमध्ये 6.36 इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेचा रिझोल्यूशन 2670×1200 पिक्सेल आहे. तर, Xiaomi 15 Pro मध्ये 6.73 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे.
दोन्ही Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro फोन Qualcomm च्या नवीन Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी Xiaomi 15 फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50MP टेलिफोटो सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. Xiaomi 15 Pro फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP Samsung JN1 अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50MP Sony IMX858 5X पेरिस्कोप सेन्सर आहे.
Xiaomi 15 फोनमध्ये 5400mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासोबत तुम्हाला 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. त्याबरोबरच, 50W वायरलेस चार्जिंग आणि 30W मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. तर, Xiaomi 15 Pro फोनमध्ये 6,100mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. यात 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.