Vivo Y300 Sale: नवीनतम स्मार्टफोनची भारतात पहिली सेल! Best ऑफर्ससह खरेदीसाठी उपलब्ध

Updated on 26-Nov-2024
HIGHLIGHTS

Vivo ने आपला नवीन Vivo Y300 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

विशेष म्हणजे Vivo Y300 मोबाईलमध्ये Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह येतो.

आज या लेटेस्ट Vivo Y300 हँडसेटची भारतात पहिली विक्री आहे

Vivo Y300 Sale: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने आपला नवीन Vivo Y300 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. दरम्यान, आज या लेटेस्ट हँडसेटची भारतात पहिली विक्री आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 25000 रुपयांच्या अंतर्गत लाँच केला आहे. विशेष म्हणजे Vivo Y300 मोबाईलमध्ये Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह येतो. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन पहिल्या सेलदरम्यान Vivo e-store, Flipkart आणि Amazon India वरून खरेदी केला जाऊ शकतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo Y300 वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स-

Also Read: 50MP फ्रंट कॅमेरासह HMD Fusion भारतात लाँच! स्मार्टफोनसह Smart Outfits देखील उपलब्ध, पहा किंमत

Vivo Y300 ची किंमत आणि ऑफर्स

नवीनतम Vivo Y300 ची सुरुवातीची किंमत 21,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही या फोनच्या 8GB+ 128GB व्हेरिएंटची किंमत आहे. याशिवाय, 8GB + 256GB व्हेरिएंट 23,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. फोनच्या पहिल्या सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y300 वर 2 हजार रुपयांची बँक ऑफर उपलब्ध आहे. यासाठी वापरकर्त्यांना निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार करावे लागतील. त्याबरोबरच, Vivo TWS 3e केवळ 1,499 रुपयांच्या सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. लक्षात घ्या की, ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी म्हणजेच केवळ 30 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध आहे.

Vivo Y300 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नव्या Vivo Y300 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये Snapdragon 4 Gen 2 चिपसेट वापरण्यात आला आहे. यासह स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम आणि विस्तारित रॅम 3.0 फिचर देखील उपलब्ध आहे, जे व्हर्च्युअल रॅम वाढवते. या फोनला IP64 रेटिंग आहे, ज्यामुळे उपकरण धूळ आणि पाणी प्रतिरोधक बनते.

vivo y300 5g

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Vivo Y300 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा म्हणून 50MP चा Sony IMX882 सेन्सर आहे. तर, सेकंडरी कॅमेरा 2MP बोकेह सेन्सर आहे. यात सुपर नाईट अल्गोरिदम आणि स्टायलिश नाईट फिचर उपलब्ध आहे. तसेच, यात AI इरेज आणि AI एन्हान्ससाठी सपोर्ट आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्यांना 5,000mAh बॅटरी मिळते, जी 80W FlashCharge सह येईल.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :