50MP मेन कॅमेरासह Vivo Y300 5G अखेर भारतात लाँच! किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी

50MP मेन कॅमेरासह Vivo Y300 5G अखेर भारतात लाँच! किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

Vivo चा लेटेस्ट Vivo Y300 5G फोन भारतात लाँच

Vivo Y300 5G फोन कंपनीने 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला आहे.

कंपनीने Vivo Y300 मध्ये Aura LED लाईटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

Vivo Y300 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा Vivo Y300 5G फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. हा कंपनीचा Y-सिरीजचा नवीन स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने हा स्मार्टफोन मिड बजेटमध्ये लाँच केला आहे. या फोनच्या लाँचनंतर Xiaomi, Samsung, Oppo आणि Realme सारख्या कंपन्यांना तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागेल. चला जाणून घेऊया Vivo च्या नवीन फोनची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: Oppo Find X8 सिरीज अखेर भारतीय बाजारात लाँच! जाणून घ्या किंमत आणि टॉप फीचर्स

Vivo Y300 5G ची भारतीय किंमत

vivo y300 5g launched in india

Vivo Y300 स्मार्टफोन 8GB+ 128GB स्टोरेज आणि 8GB+ 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 21,999 रुपये आणि 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन अधिकृत वेबसाइटवरून 26 नोव्हेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल. कंपनीने हा फोन Titanium Silver, Phantom Purple आणि Emerald Green या आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये सादर केला आहे.

Vivo Y300 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y300 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED FHD+ डिस्प्ले देण्यात अल्ला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. सुरळीत कामकाजासाठी, Vivo Y300 5G मध्ये Qualcomm चे Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, 12GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज आहे, जे 2TB पर्यंत वाढवता येते. त्याबरोबरच, हा मोबाइल फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. याला IP64 रेटिंग देखील मिळाली आहे, जे पाणी प्रतिरोधक आहे.

Vivo Y300 5g aura light

उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी, कंपनीने Vivo Y300 मध्ये Aura LED लाईटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेटअपमध्ये तुम्हाला 50MP Sony IMX882 सेन्सर आणि 2MP Bokeh लेन्स प्राथमिक सेन्सर म्हणून मिळेल. आकर्षक व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी क्लिक करण्यासाठी यामध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. Vivo च्या नवीन स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्याला 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, डिव्हाइसमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo