AI फीचर्ससह Vivo चा जबरदस्त फोन गुपचूप भारतात लाँच, किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी

Vivo ने Vivo Y19e स्मार्टफोन भारतीय बाजारात बजेटमध्ये लाँच केला.
Vivo Y19e नवीनतम बजेट स्मार्टफोन आहे, जो 10,000 रुपयांअंतर्गत येतो.
विशेष म्हणजे Vivo Y19e फोनच्या खरेदीसह Jio चा 449 रुपयांचा पॅक मोफत
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo सध्या मोठ्या प्रमाणात बातम्यांमध्ये येत असते. दरम्यान, कंपनीने स्वस्त स्मार्टफोन लाँच केल्याचे वृत्त आहे. होय, कंपनीने Vivo Y19e स्मार्टफोन भारतीय बाजारात बजेटमध्ये लाँच केला आहे. हा कंपनीचा नवीनतम बजेट स्मार्टफोन आहे, जो कंपनीने 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13MP AI कॅमेरा आहे. कमी किमतीत फोनमध्ये आणखी जबरदस्त फीचर्स मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Vivo Y19e स्मार्टफोनची भारतीय किंमत आणि तपशील-
Also Read: Launched! अखेर Oppo F29 सिरीज भारतात लाँच, दीर्घकाळ बॅटरीसह नव्या फोनमध्ये विशेष काय?
Vivo Y19e ची किंमत
Vivo ने Vivo Y19e स्मार्टफोन 7,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या 4GB रॅम+ 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी निश्चित करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री आज 20 मार्चपासून प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू होईल. कंपनीने हा फोन टायटॅनियम सिल्व्हर आणि मॅजेस्टिक ग्रीन या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला आहे.
Style that lasts! The all new vivo Y19e brings the segment’s BIGGEST battery, for all-day performance and the AI Erase feature to remove distractions effortlessly. Stay stylish, stay unstoppable!
— vivo India (@Vivo_India) March 20, 2025
Also, get exclusive benefits with Jio.https://t.co/HBhdFg8yA7
*T&C apply… pic.twitter.com/l5CGdvpsVI
एवढेच नाही तर, या फोनच्या खरेदीसह Jio चा 449 रुपयांचा पॅक मोफत येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा ऑफर केला जातो. कंपनीने Vivo India च्या X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर हॅन्डलवरून या फोनबद्दल माहिती दिली.
Vivo Y19e चे फीचर्स आणि स्पेक्स
Vivo Y19e फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. याव्यतिरिक्त, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Unisoc T7225 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB रॅम आहे. तर, फोनची स्टोरेज 64GB आहे, जी मायक्रो SD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Vivo Y19e फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देनाय्त आला आहे. या सेटअपमध्ये प्रायमरी कॅमेरा 13MP आहे. लक्षात घ्या की, या स्वस्त फोनमध्ये तुम्हाला AI फीचर्स देखील मिळतील. हा फोन AI इरेज आणि AI एन्हांस सारख्या AI फीचर्सचा समावेश आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा देखील असेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, ज्यासोबत तुम्हाला 15W चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile