प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने Y-सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo Y18t भारतात गपचूप लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन कंपनीने अगदी बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. जर आपण मुख्य फीचर्सबद्दल बोललो तर, या मोबाइल फोनमध्ये 128GB अंतर्गत स्टोरेज आणि 15W जलद चार्जिंगसह पॉवरफुल बॅटरी आहे. फोटो क्लिक करण्यासाठी यात 50MP मेन कॅमेरा देखील मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo Y18t ची किंमत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: त्वरा करा! 64MP कॅमेरासह Google Pixel 8a वर 8000 रुपयांचा Discount, ‘या’ ठिकाणी मिळतेय अप्रतिम ऑफर
कंपनीचा नवा Vivo Y18t फोन एकाच 4GB RAM + 128GB स्टोरेज पर्यायामध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,499 रुपये इतकी आहे. लक्षात घ्या की, हा फोन जेम ग्रीन आणि स्पेस ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे डिव्हाइस अधिकृत वेबसाइट आणि Flipkart वरून खरेदी केले जाऊ शकते.
नवीनतम Vivo Y18T डिव्हाइसमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ LCD डिस्प्ले आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 840 nits आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात Unisoc T612 चिपसेट मिळणार आहे. हा फोन Android 14 आधारित FunTouch OS 14 वर कार्य करेल. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फंक्शन आहे. त्याला IP54 रेटिंग मिळाले आहे. वर सांगितल्याप्रमाणे, यात 4GB रॅमसह व्हर्च्युअल रॅमसाठी सपोर्ट आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे.
याव्यतिरिक, फोटोग्राफीसाठी Vivo Y18t मोबाइल फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP प्राथमिक सेन्सर आणि 0.08MP सेकंडरी लेन्स मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा देखील यात उपलब्ध आहेत. सेल्फी शौकीन लोकांसाठी हा फोन अप्रतिम आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
कंपनीचा दावा आहे की, तिची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 62.53 तासांचा म्युझिक प्लेबॅक वेळ देते आणि PUBG सारखे मल्टीप्लेअर गेम पूर्ण चार्ज केल्यावर 6.8 तास खेळले जाऊ शकतात. कनेक्टिव्हिटीसाठी नवीन स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ 5.2, FM रेडिओ, GPS, ड्युअल सिम स्लॉट, Glones, OTG, WiFi, QZSS, BeiDou आणि USB Type-C पोर्ट आहे. एवढेच नाही तर, या फोनमध्ये ॲम्बियंट लाइट आणि ई-कंपाससारखे सेन्सर्स उपलब्ध आहेत.