Finally! लेटेस्ट Vivo V50e फोन अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स 

Finally! लेटेस्ट Vivo V50e फोन अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स 
HIGHLIGHTS

Vivo ने Vivo V50e 5G स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लाँच केला.

या स्मार्टफोनमध्ये ऑटो फोकससह 50MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल.

जाणून घ्या Vivo V50e 5G ची किंमत, प्री-बुकिंग ऑफर्स आणि उपलब्धता

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने Vivo V50e 5G स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लाँच केला आहे. या फोनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अखेर आज हा फोन भारतात लाँच केला आहे. अलीकडेच कंपनीने Vivo V50 स्मार्टफोन आधीच भारतात लाँच केला. याच सिरीजचा विस्तार करत कंपनीने आणखी एक नवीन फोन बाजारात दाखल केला आहे.

Also Read: Wow! Vivo V50e मध्ये मिळेल आकर्षक वेडिंग फोटोग्राफी मोड! जबरदस्त फीचर्स उघड, पहा अपेक्षित किंमत

विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये ऑटो फोकससह 50MP चा सेल्फी कॅमेरा आहे. याव्यतिरिक्त, स्मार्टफोनमध्ये जंबो बॅटरी देखील आहे. जाणून घेऊयात किंमत आणि सर्व तपशील-

Vivo V50e 5G launched in india know the price and features

Vivo V50e ची किंमत

Vivo V50e 5G हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. या फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 28,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 30,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.

तसेच, HDFC आणि SBI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% सूट मिळेल. त्याबरोबरच, 10% एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल. एवढेच नाही तर, Vivo TWS 3e फोनसोबत फक्त 1499 रुपयांना खरेदी करता येईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची प्री-बुकिंग आजपासून सुरू होईल, या फोनची विक्री 17 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

हा स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Flipkart या दोन्ही विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. हा स्मार्टफोन सफायर ब्लु आणि पर्ल व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

Vivo V50e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Vivo V50e स्मार्टफोनमध्ये क्वाड कर्व्हड डिस्प्ले आणि राउंड एज देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 6.77 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे.

प्रोसेसर

या नवीन विवो फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. हे विविध अनुप्रयोगांसाठी उत्कृष्ट कामगिरी आणि कार्यक्षमता देण्यासाठी डिझाइन केलेले उच्च-कार्यक्षमता प्रोसेसर आहे.

vivo v50e 5g

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, फोनच्याच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP सोनी IMX882 कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. त्याबरोबरच, फोनच्या पुढील बाजूस 50MP चा ग्रुप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5600mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. 10 मिनिटे बॅटरी चार्ज केल्यावर हा फोन तब्बल 9 तासांपर्यंतचा टॉकटाइम देतो.

अन्य

पाणी आणि धुळीसाठी फोनला IP68+IP69 रेटिंग देण्यात आले आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये चार वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स उपलब्ध असतील. महत्त्वाचे लक्षात घ्या की, हा फोन .0739 अल्ट्रा सिल्म आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo