Vivo V40e 5G: बहुप्रतीक्षित फोन 50MP सेल्फी कॅमेरासह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला Vivo V40e 5G फोन भारतात लाँच
कंपनीने Vivo V40e 5G फोन मिड बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला आहे.
हा फोन Flipkart च्या माध्यमातून 2 ऑक्टोबर 2024 पासून खरेदीसाठी उपलब्ध होणार
नवा Vivo V40e 5G फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. या फोनची चर्चा अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती, आता अखेर फोन लाँच झाला आहे. कंपनीने हा फोन मिड बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Vivo V40 सीरीजचे अनेक स्मार्टफोन्स भारतात आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हा Vivo स्मार्टफोन अल्ट्रा स्लिम डिझाइनसह आणण्यात आला आहे. जाणून घेऊयात स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
Vivo V40e 5G ची किंमत
Vivo V40e 5G फोनची किंमत 28,999 रुपयांपासून सुरू होते. ही फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येणाऱ्या बेस व्हेरिएंटची किंमत आहे. तर, फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंट 30,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. Vivo ने नवा फोन Royal Bronze आणि Mint Green कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे.
The all-new vivo V40e is here! Get ready to elevate your experience and own this piece of luxury with exclusive online offers:
— vivo India (@Vivo_India) September 25, 2024
– 10% instant discount with HDFC & SBI Cards
– Flat 10% exchange bonus
– 6 months NO COST EMI
Click the link below to pre-book now!… pic.twitter.com/rrX4WVJCHQ
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Flipkart च्या माध्यमातून 2 ऑक्टोबर 2024 पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. तर, तुम्ही ते Vivo च्या अधिकृत वेबसाइटवरून Vivo V40e 5G ची प्री-बुकिंग करू शकता. पहिल्या सेलदरम्यान, HDFC आणि SBI कार्डद्वारे व्यवहार केल्यास 10% झटपट सूट आहे. तसेच, यावर 10% एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे.
Vivo V40e 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo V40e 5G फोनमध्ये 6.77 इंच लांबीचा फुल HD+ 3D कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेचे पिक्सेल रिझोल्यूशन 2392 × 1080 आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये काही AI फीचर्स देखील आहेत. यामध्ये एआय फोटो आणि एआय इरेजर इत्यादींचा समावेश आहे. कंपनीने या आकर्षक Vivo स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट स्थापित केला आहे. ज्याद्वारे तुम्हाला उत्तम मोबाईल एक्सपेरियन्स मिळणार आहे.
Vivo V40e 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. हा Eye-AF ग्रुप सेल्फी कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 80W फ्लॅशचार्ज सपोर्टसह येते. कंपनीचा दावा आहे की ते 98 तासांचे म्युझिक प्लेबॅक आणि 20 तास YouTube प्लेबॅक देते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile