Vivo V40e 5G Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल सुरु! Best ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची संधी 

Vivo V40e 5G Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल सुरु! Best ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची संधी 
HIGHLIGHTS

Vivo ने नुकतेच भारतात Vivo V40e 5G फोन V सिरीजमध्ये लाँच केला.

आज म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून Vivo V40e 5G फोनची विक्री सुरू करण्यात आली आहे.

Vivo V40e 5G फोनमध्ये AI कॅमेरा फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने नुकतेच भारतात Vivo V40e 5G फोन V सिरीजमध्ये लाँच केला आहे. हा नवीनतम मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन कंपनीने सादर केला आहे. दरम्यान, आज म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून ग्राहकांसाठी या फोनची विक्री सुरू करण्यात आली आहे. हा Vivo फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Flipkart वरून खरेदी केला जाऊ शकतो. जाणून घेऊयात Vivo V40e 5G वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स-

Also Read: लेटेस्ट Honor 200 Lite 5G फोन Amazon सेलमध्ये अगदी कमी किमतीत उपलब्ध, मिळेल 50MP सेल्फी कॅमेरा

आज म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून Vivo V40e 5G फोनची विक्री सुरू करण्यात आली आहे.

Vivo V40e 5G ची किंमत आणि ऑफर्स

या Vivo V40e 5G फोनची किंमत 28,999 रुपयांपासून सुरू होते. ही फोनच्या 8GB/128GB स्टोरेज व्हेरिएंटची किमत आहे. तर, फोनच्या 8GB/256GB व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये इतकी आहे. Flipkart वर बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 2,900 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तर, सहज खरेदीसाठी तुम्हाला दरमहा 4,834 रुपयांच्या नो कॉस्ट EMI ची सुविधा देखील मिळाले. येथून खरेदी करा

Vivo V40e 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V40e 5G फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ 3D कर्व AMOLED स्क्रीन असेल, जी 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. त्याबरोबरच, तुम्हाला हा फोन HDR10 Plus सपोर्टसह मिळणार आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या नवीनतम Vivo फोनमध्ये MediaTek Dimension 7300 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. त्याबरोरबच, या फोनमध्ये Wi-Fi, 4G LTE, GPS, ड्युअल 5G, USB टाइप-C पोर्ट आणि ब्लूटूथ व्हर्जन 5.4 सपोर्ट उपलब्ध आहे.

Vivo V40e 5g
Vivo-V40e

फोटोग्राफीसाठी, Vivo V40e 5G फोनच्या मागील पॅनलवर 50MP Sony IMX882 सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा सेन्सरसह देण्यात आला आहे. तर, फोनच्या पुढील बाजूस एक 50MP फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जाईल. त्याबरोबरच, या फोनमध्ये AI कॅमेरा फीचर्स देखील उपलब्ध आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo