नवीनतम Vivo V40e 5G फोनवर मिळतोय हजारो रुपयांचा Discount, स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Updated on 18-Oct-2024
HIGHLIGHTS

Vivo चा Vivo V40e 5G फोन कंपनीने अलीकडेच भारतात लाँच झाला.

Vivo V40e 5G फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे.

Vivo V40e 5G सर्व बँक कार्डवर 2500 रुपयांची सूट उपलब्ध

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा Vivo V40e 5G फोन कंपनीने अलीकडेच भारतात लाँच केला आहे. हा फोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला पुढील बाजूस 50MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. तसेच तुम्हाला या फोनमध्ये मोठी बॅटरी देखील मिळणार आहे. सध्या Vivo V40e 5G फोन Flipkart वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. जाणून घेऊयात Vivo V40e 5G ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Samsung Galaxy A16 5G: 50MP कॅमेरासारख्य Powerful फीचर्ससह नवा फोन भारतात लाँच, किंमतही कमी

Vivo V40e 5G ची किंमत आणि ऑफर्स

Vivo V40e 5G स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपयांपासून सुरू होते. तर, या फोनचा टॉप व्हेरिएंट 30,999 रुपयांना येतो. हा फोन मिंट ग्रीन आणि रॉयल ब्रॉन्झ या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart वरून या स्मार्टफोनच्या खरेदीवर 2500 रुपयांची सूट मिळेल. ही ऑफर सर्व बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास उपलब्ध आहे. तसेच, हा फोन EMI सह देखील खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

Vivo V40e 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V40e 5G स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. सुरक्षिततेसाठी, या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनचा टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो.

Vivo-V40e-3.jpg

पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे. उपकरणे ड्युअल स्टीरिओ स्पीकर्ससह येतात. या फोनला पाणी आणि धुळीसाठी IP64 रेटिंग उपलब्ध आहे. उत्तमकार्यक्षमतेसाठी, स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी, Vivo V40e 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात OIS + EIS सपोर्टसह 50MP मेन कॅमेरा आणि दुसरा 8MP सेन्सर देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या पुढील बाजूस 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, यात 2x पोर्ट्रेट मोड उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, फोनचा फ्रंट कॅमेरा 4K व्हिडिओ शूटिंगला सपोर्ट करतो.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :