बहुप्रतीक्षित Vivo V40 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि नवीनतम फीचर्स

Updated on 07-Aug-2024
HIGHLIGHTS

Vivo ची नवी Vivo V40 सीरीज भारतीय बाजारात लाँच

या सिरीज अंतर्गत Vivo V40 आणि Vivo V40 Pro हे दोन स्मार्टफोन या सादर करण्यात आले आहेत.

Vivo V40 सिरीजचे प्री-बुकिंग आजपासून म्हणजेच 7 ऑगस्टपासून करता येईल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ची Vivo V40 सीरीज भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. या सिरीज अंतर्गत Vivo V40 आणि Vivo V40 Pro हे दोन स्मार्टफोन या सादर करण्यात आले आहेत. या दोन्ही मोबाईल फोनमध्ये 50MP चा आकर्षक कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo V40 सिरीजची किंमत आणि इतर सर्व जबरदस्त स्पेक्स-

Also Read: Smartphones Tips: स्मार्टफोन वापरताना ‘या’ चुका कधीही करू नका, अन्यथा होईल मोठे नुकसान

Vivo V40 सिरीजची भारतीय किंमत

Vivo V40 स्मार्टफोन 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12GB+512GB या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या तिन्ही स्मार्टफोन्सची किंमत अनुक्रमे 34,999, 36,999 आणि 41,999 रुपये इतकी आहे. तर, Vivo V40 Pro 8GB + 256GB आणि 12GB + 512GB अशा दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोन्सची किंमत अनुक्रमे 49,999 रुपये आणि 55,999 रुपये आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V40 आणि Vivo V40 Pro चे प्री-बुकिंग आजपासून म्हणजेच 7 ऑगस्टपासून करता येईल. या सिरीजच्या बेस मॉडेलची विक्री 19 ऑगस्टपासून आणि प्रो व्हेरिएंटची 13 ऑगस्ट 2024 पासून अधिकृत वेबसाइट आणि Flipkart वर सुरू होणार आहे.

Vivo V40 सिरीजचे फीचर्स आणि स्पेक्स

डिस्प्ले

Vivo V40 मध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1.5K आहे आणि रिफ्रेश दर 120Hz आहे. तर, Vivo V40 Pro मध्ये देखील 1.5K आहे आणि रिफ्रेश दर 120Hz सह डिस्प्ले उपलब्ध आहे.

प्रोसेसर

Vivo V40 मध्ये सुरळीत कामकाजासाठी, या हँडसेटमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 7 Gen 3 चिपसेट आहे. यासह 8GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळेल. तर, Vivo V40 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर उपलब्ध आहे, यासोबत 12GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे.

कॅमेरा

Vivo च्या नवीन Vivo V40 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला 50MP मुख्य सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

तर, दुसरीकडे Vivo V40 Pro मध्ये उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यासाठी Zeiss द्वारे डिझाइन केलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक, अल्ट्रा वाइड अँगल आणि टेलिफोटो लेन्स आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात देखील 50MP कॅमेरा मिळेल.

बॅटरी

Vivo V40 स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी मजबूत 5,500mAh बॅटरी आहे. तर, Vivo V40 Pro मध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :